वडील पंक्चरचं दुकान चालवतात, मुलीने पोलीस अधिकारी होत आई-वडीलांच्या कष्टाचे केले चीज

0

आज आम्ही एका मुलीची यशोगाथा सांगणार आहोत जिने शेताच्या बांधावर लाल दिव्याच्या गाडीत फिरण्याचे स्वप्न पाहिले होते. हेच स्वप्न तिने खुप अभ्यास पुर्ण केले आणि पीएसआय बनून आपल्या आई वडिलांचे नाव उंचावले आहे. स्वप्न साकार झाल्यानंतर तिने त्याच बांधावर आपल्या आईवडिलांसोबत फोटोही काढला.

पारनेर तालुक्यातील पठारी भागातील रहिवासी असलेली किरण मोरे असे त्या मुलीचे नाव आहे. आज तिने केलेल्या कष्टांचे तिला फळ मिळाले आहे. चला तर मग जाणून घेऊया तिने पोलिस उपनिरीक्षक हे पद कसे मिळवले आणि तिला यासाठी काय काय संघर्ष करावा लागला.

पठारी भागातील किरण मोरे हिचा जन्म एका साधारण शेतकरी कुटुंबात झाला होता. तिचे लहानपणही शेतातच गेले. सुरूवातीचे शिक्षण तिने गावातील जनसेवा विद्यालयात घेतले होते. त्यानंतर १० वी नंतरचे शिक्षण घेण्यासाठी तिने पुण्याला येण्याचा निर्णय घेतला.

मग तिने पुणे शहर गाठले आणि एमआयटी कॉलेज येथे डिप्लोमाला प्रवेश घेतला. डिप्लेमाचे शिक्षण घेताना तिने पुणे शहराचाही अभ्यास केला. तेव्हाच तिने डिप्लोमा करताना मुक्त विद्यापीठातून बी ए कोर्ससाठीसुद्धा प्रवेश घेतला. तिने डिप्लोमाही पुर्ण केला आणि बी एची पदवीही मिळवली.

हे सगळं करताना तिने स्पर्धा परिक्षांची माहिती काढली होती. तेथून पुढे तिने स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यास सुरूवात केली. मग तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. हे सगळं करताना तिला वाचनाचीही गोडी निर्माण झाली होती. ह्याच अवांतर वाचनामुळे तिला स्पर्धा परीक्षांची तयारी करताना खुप मदत झाली होती. तिने डिप्लोमा, बी.ए करताना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास चालूच ठेवला होता.

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना तिला असे एकदाही वाटले नव्हते की एक मुलगी पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा पास करू शकतो आणि पीएसआय बनू शकतो. पहिल्याच प्रयत्नात तिने गगणाला गवसनी घातली. गावातील मुलगी पहिल्याच प्रयत्नात पीएसआय झाली हे ऐकताच पुर्ण गावाला आनंद झाला होता.

घरची परिस्थितीही इतकी चांगली नव्हती कारण वडील शेती करता करता पंक्चरचे दुकान चालवायचे. मोठ्या भावाचे इंजिनिअरींगचे शिक्षण पुर्ण झाले असून तो इंटरनॅशनल मोटार स्पोर्ट रायडर आहे. घरातून कोणीच पोलिसांत नव्हते म्हणून तिने हा धाडसी निर्णय घेतला आणि तिला यश मिळाले.

तिचे आई वडील म्हणाले की, लहान वयात आमच्या मुलीने पोलिस सेवेत दाखल होऊन आमच्या मुलीने नाव मोठे केले. सगळ्या किरनच्या मेहनतीचे फळ असून ती पोलिस सेवेत दाखल झाल्याने आमच्या कुटुंबाला एक ओळख मिळाली आहे. तिच्या आई वडिलांना खुप आनंद झाला आहे. माहिती आवडल्यास नक्की शेअर करा. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या.

Leave A Reply

Your email address will not be published.