मैसुरच्या शेतकऱ्याचा कारनामा! एका एकरात घेतली ३०० प्रकारची पिके, कमावतोय १० लाख

0

शेती हा एकप्रकारचा जुगार मानला जातो. भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी शेती ही पावसाचा अंदाज घेऊन केली जाते. त्यात गेल्या काही वर्षात हवामानात झालेले बदल पाहता आणि पाण्याच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांचे खुप हाल झाले आहेत.

कर्नाटकात मैसूर येथे राहणारा एक शेतकरीही या दुष्काळामुळे १९८४ सालापासून त्रस्त झाला होता. त्यांनी आपल्या शेतात अनेक प्रकारचे बदल केले. त्यांनी सेंद्रिय शेती केली, सेंद्रिय खतांचा वापर केला. परंतु पाण्याची टंचाई असल्यामुळे त्यांच्या हातात निराशाच आली.

पण त्यांनी हार मानली नाही आणि त्यांनी एका एकराच्या जमिनीवर आंतरपिक पद्धतीने जवळपास ३०० प्रकारची पिके घ्यायला सुरूवात केली. आणि त्यांना यातून यश मिळाले. त्यांना यातून खुप फायदा झाला.

या शेतकऱ्याचे नाव आहे थमैया पी. पी. त्यांचे वय ६९ आहे आणि आज त्यांनी शेतीतून चांगला नफा कमावला आहे. त्यांचा पाण्याचा वापरही ५० टक्क्यांनी कमी झाला आहे. यामुळे वर्षकाठी त्यांना १० लाखांचा नफा मिळत आहे.

मल्टी लेअर फार्मिंगच्या माध्यमातून थमैया यांनी आपल्या एका एकरात नारळ, फणस, विविध कडधान्य, भाजीपाला, आंबा, सुपारी, केळी अशी विविध पिके घेतली आहेत. या पद्धतीमध्ये शेतकरी जागेचा जास्तीत जास्त वापर करतो.

यासाठी दोन वेगवेगळ्या उंचीची झाडं एकाच ठिकाणी आजूबाजूला लावतो. थमैया यांनी द बेटर इंडियाला बोलताना या पद्धतीचे महत्व समजावून सांगितले आहे. ते म्हणाले की, ज्यावेळी मी एक झाड लावत असतो त्यावेळी दुसरं झाड हे आधीच मोठे झालेले असते आणि त्याला फळे आलेली असतात.

यामुळे झाडांना लागणारे पाणी हे कमी लागतं. बऱ्याच वेळा एका झाडाला दिलेलं पाणी हे आजूबाजूच्या झाडांनासुद्धा पुरून जाते. ज्याने खुप प्रमाणात पाणी वाचते. सुरूवातीला जेव्हा त्यांना ही पद्धत कळाली तेव्हा त्यांना हा प्रयोग यशस्वी होईल का नाही याची शंका होती.

परंतु त्यांनी मेहनत घेतली तेव्हा त्यांना वाटू लागले की आपला निर्णय बरोबर आहे. त्याआधी त्यांनी बाकीच्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन माहिती घेतली होती. त्यांनी आपल्या शेतात अनेक आयुर्वेदिक औषधांची झाडेही लावली आहेत.

याचसोबत एकदा पिक घेऊन झाल्यानंतर त्यांनी झाडे मुळापासून काढली. ज्यामुळे सुर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचू लागला. नारळ, सुपारीसारख्या पिकांमुळे त्यांना चांगला फायदा होत आहे. सध्या ते वर्षाकाठी १० लाख रूपये कमवत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.