वेटरचं काम सोडून केली भरिताच्या वांग्याची शेती, आता कमावतोय लाखो रूपये

0

जर नीट अभ्यास करून शेती केली तर शेतीसारखा नफा देणारा व्यवसाय दुसरा कोणताच नाही. आजर्यंत अनेक शेतकरी मालामाल झालेले तुम्ही पाहिले असतील. आज अशाच एका शेतकऱ्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यांचे नाव आहे जोतीराव माळी.

त्यांनी तब्बल १९ वर्षे मुंबईतील एका हॉटेलमध्ये एका वेटरची नोकरी केली होती. वेटरची नोकरी केल्यानंतर ते गावाकडे परतले. त्यांना त्यांच्या मातीची ओढ गावाकडे घेऊन आली. शेतीचा अभ्यास करून त्यांनी आपल्या शेतात भरीताच्या वांग्याची लागवड केली आणि आता लाखोंचा नफा त्यांना मिळाला आहे.

शेतीत जीव ओतून काम केलं तसेच बाजाराचा अभ्यास करून जर पिके घेतली तर तुमचा फायदा झालाच म्हणून समजा. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण जोतीराव माळी फक्त दुसरी पास आहेत.

त्यांची आजरा तालुक्यात सहा एकर जमीन आहे. मात्र काही वर्षांपुर्वी त्यांची आर्थिक परिस्थिती हालाखिची असल्यामुळे त्यांनी मुंबईला जाऊन वेटरची नोकरी केली. त्यानंतर गावाकडे येऊन त्यांनी एक हॉटेल सुरू केले.

त्यांची परिस्थिती थोडी सुधारली पण त्यांच्या मनातून शेतीचे वेड जात नव्हते. २००३ साली त्यांनी शेती करण्यास सुरूवात केली. अजून ३ एकर जमीन विकत घेतली. बंगाली, पंजाबी आणि गुजराती माणसांकडून भरिताच्या वांग्याला खुप मागणी असते असे त्यांना समजले.

मार्च महिन्यात त्यांनी भरिताच्या वांग्याच्या जनक जातीच्या रोपांची लागवड केली. लागवडीपुर्वी त्यांनी चांगल्या प्रकारे जमिनीची मशागत केली. त्यावर मल्चिंग पेपर हाथरला. आठ फुटांचे अंतर सोडून त्यांनी बेड तयार केले.

एकरी २ हजार रोपे लावली. अशा प्रकारे त्यांना ९ एकरासाठी १८ हजार रोपे लागली. सेंद्रिय खतांसाठी त्यांना २३०० रुपये खर्च आला. आठवड्यातून ३ वेळा या वाग्यांची काढणी केली जाते. तोडलेली वांगी स्वच्छ केली जातात आणि त्यांना बॉक्समध्ये भरून वाशी मार्केटमध्ये पाठवली जातात.

त्यांना ९ एकरातून ३५ टन वांग्यांचे उत्पादन मिळाले आहे. या वाग्यांना त्यांना ३० रूपये किलोचा दर मिळाला आहे. असे सगळे मिळून त्यांना १० लाख रूपये मिळाले आहेत. दोन महिन्यात त्यांना ७० टन उत्पादनाची अपेक्षा आहे.

या उत्पादनातून त्यांना २० लाख रूपये मिळतील. त्यांना सगळा मिळून ७ लाख रूपयांचा खर्च झाला होता. तो खर्च जरी वजा केला तरी त्यांना २२ ते २३ लाख रूपये नफा होईल अशी आशा त्यांना आहे. मल्चिंग पेपरमुळे त्यांना पाणी कमी लागले आणि त्यांना यासाठी एनएचएम अंतर्गत अनुदानही मिळाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.