मेहनत केली पण वाया नाय गेली! ३ एकरात कमावले तब्बल २२ लाख रूपये

0

आज आम्ही तुम्हाला अशा शेतकऱ्याबद्दल सांगणार आहोत ज्याने अनेक अडथळे पार करत यशाचे शिखर गाठले आहे. शेतकऱ्यावर आलेल्या अस्मानी आणि सुलतानी संकटांची नेहमी चर्चा होते. सरकारवर असेही आरोप लावले जातात की शासकीय धोरणांमुळे शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे.

पण त्यांनी कसलीही परवा केली नाही आणि ते कष्ट करत राहिले. कर्जत तालुक्यातील तीन भावांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी शेतात नवीन प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. सर्वात प्रथम त्यांनी सेंद्रिय पद्धतीने पेरूची बाग फुलवण्याचा निर्णय घेतला.

या पेरूच्या बागेने त्यांना आता लखपती बनवले आहे. कर्जत तालुक्यातील युवा शेतकरी निलेश शेवाळे यांनी हा पेरूचा प्रयोग केला होता. त्यांनी तीन एकर क्षेत्रावर शेतीची मशागत केली होती. पारंपारिक सोडून काहीतरी नवीन करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

तीन एकरची मशागत केल्यानंतर त्यात शेणखत आणि कोंबडीखत टाकले. त्यात ७ बाय ६ अंतरावर पेरूची दर एकरात १००० झाडे लावली. ठिबक सिंचनाद्वारे त्यांनी झाडांना पाणी दिले. केवळ शेणखताचाच वापर केला. कोणत्याही प्रकारची रासायनिक खते त्यांनी आपल्या बागेत वापरली नाहीत.

त्याचा असा परिणाम झाला की पेरूंचा आकार मोठा होता आणि पेरू खाण्यासही गोड होता. त्यामुळे त्यांच्या पेरूंना खुप मागणी होती. हा पेरू त्यांनी केवळ स्थानिक बाजारात विकला होता. तीन एकरात त्यांनी तैवानी पिंक पेरूचे उत्पादन घेतले होते.

त्यांना सोळा महिन्यात तीन एकरांत ५० टनांचे उत्पादन मिळाले होते असे निलेश यांनी सांगितले आहे. त्यांना यातून एकून २४ लाखांचे उत्पन्न मिळाले होते. पेरूची विक्री त्यांनी पुण्याला केली होती. प्रति किलोला त्यांना ३० ते ६० रूपयांचा भाव मिळाला होता.

या पेरूचे वर्षभरात दोन बहर येतात. योग्य प्रकारे नियोजन, छाटणी केली तर या पेरूचे वर्षभरात २ बहर येतात. टिकवणक्षमता जास्त असल्याने त्यांचे नुकसानही होत नाही. दुष्काळी भागासाठी पेरूचे उत्पादन चांगले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.