शेतीत केला अनोखा प्रयोग, बार्थितील कलिंगडे विकली थेट सौदी अरेबियात

0

तुम्ही अनेक शेतकऱ्यांच्या यशोगाथा वाचल्या असतील पण ही यशोगाथा वेगळी आहे. अवघ्या अडीच एकरात या शेतकऱ्याने कारनामा करून दाखवला आहे. मागील वर्षी अडीच एकरात चांगले उत्पन्न त्यांना मिळाले होते.

तरीही त्यांनी एका पिकात आतंरपिक घेतले. आणि त्यांना दोन्ही पिकांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यांनी केळीमध्ये कलिंगडाचे पिक घेतले होते आणि याच पिकातून त्यांना ८५ टन उत्पन्न मिळाले.

एवढच काय तर त्यातील ७० टन कलिंगडे त्यांनी सौदी अरेबियामध्ये विक्रीसाठी पाठवले आहेत. अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न मिळवल्याचा अनुभव वेगळाच होता असे ते म्हणाले आहेत. या जोडप्याचे नाव आहे कल्पना रामराजे आणि रामराजे ताकभाते. मागील वर्षी त्यांनी अडीच एकरात कांद्याचे पिक घेतले होते.

त्यातून त्यांना साडेतीन लाखांचे उत्पन्न मिळाले होते. पण यावर्षी त्यांनी ठरवले होते की कांद्याचे पिक घ्यायचे नाही. चर्चा केल्यानंतर त्यांनी केळीमध्ये कलिंगडाची लागवड करायची असे ठरवले.

त्यांनी केळीची ३ हजार ५०० रोपे जळगाव येथून खरेदी केली पण यावेळी खुप मोठा अवकाळी पाऊस झाल्याने त्यांनी केळीची रोपे घरीच उतरवून ठेवली. त्यांचे इतर साहित्य वाहून गेले. पुढे शेती मशागतीसाठी दोन महिने गेले पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी बोअरमधून शेतीला पाणी दिले.

शेतामध्ये केळीची लागवड केली आणि त्यामध्ये मॅक्स जातीच्या कलिंगडाचे पिक घेतले. ६५ दिवसांत पीक येते हे त्यांना माहित होते. सेंद्रिय खत, फवारणी, शेतमजूर असा सगळा मिळून त्यांना १ लाख रूपये खर्च आला.

त्यांना असा अंदाज होता की ४० टन उत्पन्न मिळेल पण त्यांना ७० टनांचे उत्पन्न मिळाले. मग त्यांनी ही कलिंगडे त्यांनी सौदीला पाठवली. त्यातून त्यांना चार लाख रुपये उत्पन्न मिळाले. आजूनही बागेत १५ टन कलिंगडे शिल्लक आहेत.

केळीच्या पिकात कलिंगड आंतरपिक घेऊन केळीचा खर्च निघेल असा प्रयोग त्यांनी केला आणि त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला. पावसामुळे त्यांचे नुकसान झाले पण आर्थिक व्यवहार व्यवस्थित झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.