या शेतकऱ्याला म्हणतात पांढऱ्या क्रांतीचा जनक, मशरूम शेतीतून करतोय लाखोंची कमाई

0

पंजाबमध्ये सगळ्यात जास्त शेती केली जाते. पंजाबमध्ये अनेक प्रगतीशील शेतकरी आहेत. त्यातीलच एक शेतकरी आहेत दलजित सिंह. त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांनी मशरूमची शेती करण्यास सुरूवात केली.

त्यांना चित्ती म्ह्णजे पांढऱ्या क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या तारण जिल्ह्यातील हरबन्सपुरा या गावात अनेक शेतकरी शेतीचा व्यवसाय करत आहेत.

त्यांच्यामध्ये ३४ वर्षीय तरूण दलजितसंह यांची वेगळीच ओळख आहे. चिट्टी क्रांतीचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी पारंपारिक शेती सोडून मशरूम लागवड सुरू केली. सुरूवातीला त्यांना खुप अडचण आली पण आता ते अनेकांसाठी प्रेरणा बनले आहेत.

फक्त १३ महिन्यांत त्यांनी १३ ते १४ लाख रूपयांचा नफा कमावला आहे. त्यांना दोन मुले आहेत. हरबन्सपुरा या गावाची लोकसंख्या ७०० आहे. दलजित यांच्याकडे ७ एकर जमिन आहे. आर्थिक त्रासातून मुक्त होण्यासाठी त्यांनी मशरूम शेतीची निवड केली.

तरूण असाताना त्यांनी १९९९ मध्ये एका शेडमध्ये मशरूमची लागवड केली होती. पण आता त्यांच्याकडे २० शेड आहेत. प्रत्येक शेडची लांबी ७० फूट आणि रूंदी २० फूट आहे. येथे ते मशरूम उगवतात.

लागवडीमुळे त्यांना आर्थिक बळ मिळाले आहे. ते दरवर्षी १५० क्विंटल मशरूम उगवतात. २०० ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये ते हे मशरूम विकतात. असे मिळून सहा महिन्याला त्यांना १३ ते १४ लाखांचे उत्पन्न मिळते आहे.

त्यांच्याकडे आठ ते दहा कामगार काम करतात. त्यांनाही ते पगार देतात. यशस्वी शेतकरी म्हणून कृषी विभागानेही त्यांचा सत्कार केला आहे. सध्या ते इतर शेतकऱ्यांना मशरूम उत्पादनाचे प्रशिक्षण देत आहेत.

त्यांच्या पत्नीलाही त्यांचा अभिमान आहे. त्यांच्या या कार्यामुळे सगळे गाव आनंदी आहे. तेथील पोलिस उपायुक्तांनीही त्यांचा १५ ऑगस्ट २०१९ ला सत्कार केला होता. डिप्टी कमिश्नर कुलवंससिंह यांनीही दिलजित यांचे कौतुक केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.