शेतकरी झाला मालामाल! एकदाच लागवड, ३५ वर्षे नफा; पहिल्याच वर्षी झाले ४ लाखांचे उत्पादन

0

आज आम्ही तुम्हाला एका अशा शेतकऱ्याबद्दल सांगणार आहोत ज्यांनी पारंपारिक शेतीला फाटा देत योग्य नियोजन आणि परिश्रमातून लिंबाची शेती फुलवली आहे. या लिंबाच्या शेतीतून त्यांना पुढील ३५ वर्षे उत्पादन मिळणार असून त्यांचे यंदाच्या घडीला ४ लाखांचे उत्पादन झाले आहे.

या शेतकऱ्याने दाखवून दिले आहे की कुठल्याही पिकातून भरघोस उत्पादन आपण घेऊ शकतो. एक नवीन आदर्श त्यांनी शेतकऱ्यांसमोर उभा केला आहे. पंढरी जुगनाके असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते सेलू तालुक्यातील बोरी कोकाटे येथील रहिवासी आहेत.

पंढरी जुगनाके यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनाच्या साहाय्याने लिंबाची लागवड केली. पारंपारिक शेती व रासायनिक खतांचा वापर न करता त्यांनी योग्य नियोजन केले होते. त्यांच्यांकडे १७ एकर जमीन आहे.

तुर, कपाशी, सोयाबीन अशी पारंपारिक शेती करताना त्यांचा उत्पादन खर्चाचा ताळमेळ बसत नव्हता. शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर केल्याने जमिनीचा कस कमी होत होता आणि उत्पादन खर्चही वाढत होता.

पंढरी यांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब केला. यातून त्यांना शेणखताचा वापर करून लिंबाच्या झाडांची निवड केली. हा प्रयोग अनेक शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरत आहे. त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे की रासायनिक खतांचा वापर न करताही आपण भरघोस उत्पन्न मिळवू शकतो.

त्यांनी पहिले पाच वर्षे फक्त देखभाल चालूच ठेवली. कारण पाच वर्षांनंतर उत्पादन सुरू होणार होते. यावर्षीपासून उत्पादन सुरू होणार होते आणि त्यांनी यावर्षी बक्कळ पैसा कमवला आहे. त्यांना सगळा मिळून ५० हजार रूपये खर्च झाला होता.

त्यामध्ये शेणखत, मजुरी यांचा समावेश होता. लिंबाच्या पिकांना कोणत्याही वन्य प्राण्याचा त्रासही नाही. त्यांनी २०१३ मध्ये एका एकरात ५०० रोपट्यांची लागवड केली होती. यानंतर २०१५ मध्ये त्यांनी पुन्हा ५०० रोपांची लागवड केली.

असा सगळा मिळून त्यांना ३५ हजार रूपये खर्च आला होता. सध्या त्यांनी ४ लाखांचे उत्पादन लिंबातून मिळाले आहे. त्यांचा हा प्रयोग पाहून अनेक शेतकरी आता लिंबाची शेती करू लागले आहेत. रासायनिक शेतीपासून लांब राहून आता शेतकरी सेंद्रिय शेतीने शेती करू लागले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.