शेतकऱ्यासाठी मिरची झाली गोड, तीन महिन्यातच शेतकऱ्याने कमावले ७ लाख

0

तुम्ही आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या यशोगाधा ऐकल्या असतील. पण आज आम्ही एका शेतकऱ्याबद्दल सांगणार आहोत जी तुम्ही कधीच ऐकली नसेल. कारण एका शेतकऱ्याला मिरची गोड ठरली आहे.

या शेतकऱ्याला तिखट मिरचीने तीन महिन्यातच ७ लाखांचे उत्पन्न मिळवून दिले आहे. विशेष म्हणजे दुष्काळी भागात मिरचीची लागवड करणे सोपी गोष्ट नाही. त्यांच्यामुळे अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली आहे.

महाराष्ट्रात दुष्काळी जिल्हा म्हणून बीडची ओळख आहे. या ठिकाणी पाण्याची खुप कमतरता आहे. त्यामुळे शेतातून मिळणाऱ्या नफ्यात घट होते. पण जिद्द असेल तर माणूस काहीही करू शकतो.

सर्वकाही साध्य केले जाऊ शकते हे बीडच्या या शेतकऱ्याने सिद्ध करून दाखवले आहे. पारंपारिक शेतीला वगळून काहीतरी नवीन करण्याचा या शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी झाला. संजय विधाते असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे.

विधाते यांनी पॉलिहाऊसमध्ये ढोबळ्या मिरचीची शेती करण्यास सुरूवात केली होती. त्यांना पहिल्याच वर्षी भरघोस उत्पन्न मिळवले होते. नांदूर या गावातील ते रहिवासी आहेत आणि या गावात पाण्याचा कोणताच कायमस्वरूपी स्त्रोत नाही.

पावसाच्या येणाऱ्या पाण्यानुसार या गावात पिके घेतली जातात. विधाते यांनी माळरानावर रंगीत ढोबळी मिरची फुलवली आणि बक्कळ पैसा कमावला. ढोबळ्या मिरचीला पाणीही कमी लागते आणि ठिबक सिंचनाने पाण्याची बचतही होते.

त्यांना फलोत्पादन योजनेअंतर्गत आष्टी कृषी विभागामार्फत पॉलिहाऊस उभारण्यासाठी ९ लाखांचे अनुदान मिळाले. याचा फायदा त्यांनी घेतला आणि ढोबळ्या मिरचीची लागवड करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

जून महिन्यात त्यांनी २० गुंठ्यात मिरचीची ५ हजार ६०० रोपे लावली. त्यांना यातून उत्पन्न मिळण्यास सुरूवात झाली आहे. त्यांनी ३ महिन्यात ७ लाख रूपयांचे विक्रमी उत्पादन मिळवले आहे. आणखी चार महिन्यात त्यांना ८ ते १० लाखांचे उत्पन्न मिळेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.