१० हजारात पेरली काळी मिरची, आता वर्षाला कमावतोय १९ लाख रूपये, वाचा यशोगाथा

0

आज आम्ही अशा एका शेतकऱ्याबद्दल सांगणार आहोत ज्याने काळ्या मिरचीची शेती करून यशाचे शिखर गाठले आहे. हा शेतकरी मेघालय येथील रहिवासी आहे. मेघालय येथील शेतकरी शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा देत असतात.

मेघालयमध्ये काळ्या मिरचीची शेती करून त्यांनी लाखो रूपये कमावले आहेत. त्या शेतकऱ्याचे नाव आहे नानादर बी मारक. त्यांना त्यांच्या शेतीमधील कार्याबद्दल पद्मश्री पुरस्कारही मिळाला आहे.

नानादर बी मारक त्यांच्या शेतामध्ये जैविक पद्धतीने काळ्या मिरचीची शेती करतात. ते मेघालय भागातील पश्चिम गारो टेकड्यांमध्ये राहतात. या परिसरात काळ्या मिरचीची शेती केली जाते.

नानादर बी मारक यांनी २०१९ मध्ये १९ लाखांचे उत्पादन मिळवले होते. नानादर यांना १९८० काळात सासरच्या लोकांकडून ५ हेक्टर जमीन मिळाली होती. यामध्ये त्यांनी काली मिरचीची ३४०० मिरच्यांची झाडे लावली होती.

त्यांनी १० हजारात १० हजार झाडं लावली होती. नानादर यांनी थोड्या कालावधीनंतर झाडांची संख्या वाढवली होती. सुरूवातीला त्यांनी रासायनिक शेती केली आणि नंतर त्यांनी जैविक शेती करण्याचा निर्णय घेतला होता.

नानादर यांचे वय सध्या ६१ वर्षे असून त्या भागातील ते एक अग्रगण्य प्रगतीशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. त्यांनी शेती करताना पर्यावरणाची काळजी घेतली होती. गारो हिल्स टेकड्या पुर्णपणे जंगलाचा प्रदेश आहे.

मारक यांनी मोठमोठी झाडे तोडण्याच्या ऐवजी त्यांचे संवर्धन करत त्यांच्यामध्ये मिरच्यांची लागवड केली. मारक यांनी त्यांच्या जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनाही काळ्या मिरचीची लागवड करण्यासाठी मदत केली.

नानादर यांची काळी मिरची संपुर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. २०१९ मध्ये नानादर बी मारक यांना काळ्या मिरचीच्या शेतातून १९ लाखांचे उत्पन्न मिळाले होते. भारत सरकारने त्यांच्या शेतीची दखल घेऊन त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते.

काळ्या मिरचीची शेती करताना दोन झाडांमध्ये ८ फुटांचे अंतर ठेवायचे. दोन झाडांमध्ये अंतर जास्त ठेवल्याने उत्पादन जास्त मिळते. प्रत्येक झाडाला गायीच्या शेणापासून बनवलेलं खत आणि वर्मी कंपोस्ट खत दिले जाते अशी माहिती मारक यांनी दिली आहे.

दरवर्षी ते १८ ते १९ लाखांचे विक्रमी उत्पादन काळ्या मिरचीतून घेतात. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना अनेक लोक एक प्रगतीशील शेतकरी म्हणून ओळखतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.