शेतीत नफा होत नव्हता म्हणून केला भन्नाट प्रयोग, आता करतोय लाखोंची कमाई

0

 

शेतकरी शेतात नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत असतात. अशात काहींना यश मिळते, तर काहींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका शेतकऱ्याची गोष्ट सांगणार आहोत. ज्या शेतकऱ्याला शेतीत नुकसान झाले होते पण हार न मानता  त्याने  शेतात एक प्रयोग केला आणि त्या एका प्रयोगाने आता तो लाखोंची कमाई करत आहे.

गुजरातमध्ये राहणाऱ्या या माणसाचे नाव  मगन कामरिया असे आहे. ते सुरुवातीला भुईमूग आणि कापूसची शेती करत होते, पण त्यांना त्या शेतीमध्ये यश मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी पेरूची लागवड करताना एक प्रयोग केला आणि आता ते पेरूचे चांगले उत्पन्न घेऊन वर्षाला १० लाखांची कमाई करत आहे.

कामरिया यांनी सुरुवातीला जेव्हा शेती केली, तेव्हा त्यांना नफा मिळत नव्हता. भुईमूग आणि कापुसची शेती त्यांनी जवळपास पाच वर्ष केली. पण पाच वर्षांनंतर त्यांना इस्त्रायल पद्धतीने पेरूच्या लागवडीची माहिती मिळाली.

कामरिया यांनी छत्तीसगड आणि रायपूरवरून थायलंडमध्ये उगवले जाणारे पेरूचे पाच हजार रोपे मागवली. कामरिया यांनी इस्त्रायल पद्धतपद्धतीनेची लागवड कशी केली जाते याबद्दल जाणून घेतले आणि ही शेती करण्यास सुरुवात केली.

शेती करताना कामरिया यांनी खूप मेहनत घेतली. तसेच ही शेती करताना ठिंबक सिंचनद्वारे पेरूच्या रोपट्यांना पाणी दिल्यामुळे चांगले उत्पन्न मिळाले.  कमी उंचीच्या झाडांनाही ३५० ग्रॅम ते १ किलोच्या वजनाचे पेरू तयार होत आहे.

विशेष म्हणजे या पेरूंची चव चांगली असल्याने याला बाजारात चांगलीच मागणी मिळाली. आता त्यांनी लागवड केलेल्या झाडाच्या  प्रत्येक पेरूचे वजन १ ते २ किलो इतके आहे. तसेच कामरिया आता ५० एकराच्या जागेत ही पेरूची लागवड करत असून ते या शेतीतुन वर्षाला १० लाख रुपयांची कमाई करत आहे. तसेच त्यांनी २० पेक्षा जास्त लोकांना रोजगार सुद्धा दिला आहे.

ही शेत करण्यात कामरिया यांची पत्नी त्यांना मदत करते. त्या सांगतात, पेरूची शेती करणे दुसऱ्या कोणत्या पिकांची लागवड करण्यापेक्षा सोपी आहे. फक्त या झाडांना कीड पडण्याची भीती असते, पण घरगुती उपायांनी पेरूच्या झाडांना कीड लागण्यापासून वाचवता येऊ शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.