जाळ अन् धुर संगटच! शेतकऱ्याने ३८ गुंठ्यात खरबूज, मिरची, फ्लॉवरमधून मिळवले १० लाख

0

आज आम्ही तुम्हाला अशा शेतकऱ्याची यशोगाथा सांगणार आहोत ज्याने ३८ गुंठ्यात तब्बल १० लाख रुपये कमावले आहेत. पाण्याची कमतरता असताना आणि प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती असताना या संकटांवर मात करत त्यांनी ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

शेवाळवाडी येथील शेतकरी दत्तात्रय शेवाळे यांनी ३८ गुंठ्याच्या माळरानावर खरबूज, मिरची आणि फ्लॉवर यांची शेती फुलवली होती. त्यांनी ही शेती मल्चिंग पेपरवर फुलवली होती. त्यांच्या उत्पादनाला सुरूवात झाली असून त्यांना अपेक्षा आहे की त्यांना कमीत कमी दहा लाखांचे उत्पन्न मिळेल.

दत्तात्रय शेवाळे हे त्यांच्या भागातील एक खुप प्रगतीशील शेतकरी आहेत. पुर्ण गावात त्यांची ख्याती आहे. आजवर त्यांनी केलेले अनेक प्रयोग यशस्वी झाले आहेत. यावेळेसही त्यांचा प्रयोग यशस्वी झाला.

त्यांनी मल्चिंग पेपरवर मिरची, खरबूज, फ्लॉवर पिक घेण्याचे ठरवले होते. पाण्याची कमतरता तर होतीच पण त्यांनी ठिबक सिंचनाची सोय केली होती. त्यानुसार त्यांनी ठरल्याप्रमाणे सर्वात आधी जमिनीची उभी आणि आडवी नांगरणी केली.

त्यानंतर खत टाकले व पाच फुटांचे बेड तयार केले होते. त्यावर मल्चिंग पेपर हातरून त्यामध्ये मिरची, खरबूज, फ्लॉवर या पिकांची लागवड केली. या सर्व पिकांना ठिबकद्वारे पाणीपुरवठा केला. सध्या त्यांच्या पिकांची योग्य प्रमाणात वाढ झाली असून उत्पन्नाला सुरूवात झाली आहे.

सध्या मिरची ३५ रूपये किलो आणि खरबूज २२ रूपये किलो आहे. त्याप्रमाणे कऱ्हाड, रत्नागिरी बाजारपेठेत मालाला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यांना अशी अपेक्षा आहे की, फ्लॉवर ४ टन, खरबूज १२ टन, मिरची २२ टन असे उत्पादन मिळेल अशी आशा आहे.

त्यामुळे सध्याच्या बाजारभावाप्रमाणे त्यांना १० लाखांचे उत्पन्न मिळेल अशी त्यांना आशा आहे. त्यांनी ही सर्व माहिती एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितली आहे. फक्त ३८ गुंठ्यात त्यांनी नंदनवन फुलवून दाखवले आहे.

पाण्याची कमतरता असताना आणि प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती असताना त्यांनी जो प्रयोग राबविला आहे तो पाहण्यासाठी अनेक शेतकरी त्यांच्या शेताला भेट देत आहेत. अनेक जणांनी त्यांच्या या प्रयोगाचे कौतुक केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.