नाद खुळा! कर्ज घेऊन सुरू केली शेती, आता करतोय करोडो रुपयांची कमाई

0

 

आता शेतकरी शेतात नवनवीन प्रयोग करताना दिसून येतात, त्यांच्या प्रयोगातून ते तगडे उत्पन्न घेऊन लाखो रुपयांची कमाई पण करतात. पण आज आम्ही तुम्हाला ज्या शेतकऱ्याची गोष्ट सांगणार आहोत ते शेतात वेगवेगळे प्रयोग करुन लाखोंची कमाई तर करतच आहे, पण ते अनेकांसाठी प्रेरणादायी सुद्धा ठरत आहे.

पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यात राहणाऱ्या या शेतकऱ्याचे नाव ज्ञानेश्वर बोडखे आहे. त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. गरीबीचा परिस्थिती असल्याने त्यांनी १० वीपर्यंतचेच शिक्षण घेता आले.

त्यानंतर घरचे शेती करत असल्याने त्यांनी शेती करण्यास सुरुवात केली. पण त्यांना शेतीत हवे तसे उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी ऑफिस बॉय म्हणून काम सुरु केले. पण एकदा पुन्हा त्यांनी शेती सुरु केली आणि शेतात वेगवेगळे प्रयोग केले. या प्रयोगातून आता ते करोडो रुपयांची उलाढाल करत आहे.

सुरुवातीला जेव्हा त्यांनी शेती सोडली होती,  तेव्हा त्यांनी एका बिल्डरकडे ऑफिस बॉय म्हणून काम सुरु केले होते. तेव्हा ते सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत काम करायचे.

तेव्हा त्यांनी एका वर्तमानपत्रात एका शेतकऱ्याची यशोगाथा वाचली होती.त्या शेतकऱ्याने पॉलीहाऊसमध्ये शेती सुरु करुन महिन्याला १२ लाखोंची कमाई करत होता. हे वाचताच त्यांनी पुन्हा शेती करण्याचा निर्णय घेतला.

बोडखे यांनी ती नोकरी सोडली आणि पुण्यात येऊन दोन दिवसाचे पॉलीहाऊसची शेती करण्याचे वर्कशॉप केले. पण त्यात त्यांच्या काही गोष्टी लक्षात आल्या नाही, त्यामुळे त्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांशी भेट घेतली आणि तिथे त्यांनी अधिकाऱ्यांसोबत शेतीत कसे काम करायचे ते शिकले.

त्यानंतर त्यांनी बँकेकडून कर्ज घेतले एक हजार स्क्वेअर फुटच्या पॉलीहाऊसमध्ये कार्नेशन फुल आणि गुलाबाच्या फुलांची शेती सुरू केली. त्यांनी या फुलांची मोठमोठ्या शहरात निर्यात सुरू केली. इतकेच नाही तर त्यांना या प्रयोगात इतके यश आले की त्यांनी १० लाखांचे कर्ज १ वर्षात भरून टाकले.

पुढे त्यांनी एक अभिनव किसान नावाचा क्लब सुरू केला, त्यामध्ये महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश अंक कर्नाटकच्या शेतकऱ्यांचा समावेश आहे. या क्लबमध्ये  दीड लाख शेतकरी जुडलेले असून याची वार्षिक उलाढाल ४०० कोटी रुपये आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.