वाचा, सांगलीचा ‘हा’ पठ्ठ्या १ एकराच्या जमिनीत कसे घेतोय १३० टन ऊसांचे उत्पादन

0

 

शेतकरी नेहमीच आपल्याला शेतात वेगवेगळे प्रयोग करताना दिसून येतात. तितकाच तो आपल्या शेतात कष्ट घेताना पण दिसून येतो.  आजची गोष्ट एका अशा शेतकऱ्याची आहे ज्याने आपले एकेरी ४० टन ऊसांचे उत्पादन १३० टनांपर्यंत नेले आहे.

सांगली जिल्ह्यातील या शेतकऱ्याचे नाव अमर पाटील असे आहे. अमर पाटील यांनी धडपड, प्रयोगशिलता, शिकाऊ वृत्तीच्या आणि उत्कृष्ट तंत्रज्ञानाच्या या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांनी ऊस शेतीत मास्टरी मिळवली आहे.

एकेकाळी अमर यांना १ एकर शेतात उसाचे ४० टन असलेले उत्पन्न आता त्यांच्या मेहनातीमुळे १३० टनांपर्यंत पोहचले आहे. या ऊसातून त्यांना लाखोंचे उत्पादन मिळत आहे. आता त्यांचे लक्ष ऊसाचे उत्पन्न १५१ टनपर्यंत घेऊन जायचे आहे.

अमर पाटील वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी गावात राहतात. या गावात ऊस हे मुख्य उत्पादन आहे. तसेच रताळी, भाजीपाला, या पिकांसाठीही हा परिसर ओळखला जातो.

अमर पाटील यांच्या कुटुंबांची एकूण ३८ एकर शेती आहे. ही ३८ एकर शेती त्यांचे वडील आणि दोन चुलते यांची एकत्र शेती केली आहे.

अमर यांना लहाणपणापासूनच शेतीची आवड होती. त्यामुळे बारावीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी शेती करण्यास सुरुवात केली. त्यांनी शेतात मेहनत घेऊन पडीक जमीनीची मशागत करुन ती लागवडी योग्य बनवली.

त्यांनी प्रत्येक गोष्ट नियोजनबद्ध पद्धतीने केली. त्यांनी ३ विहीर खोदल्या आणि शेतीसाठी लागणारे पाण्याचे स्त्रोत वाढवले. तसेच पाईपलाईन बसवून पुर्ण क्षेत्रात ठिंबक सिंचनाचे काम केलेले आहे.

पुर्वी या क्षेत्रात ४० ते ५० टन ऊसाचे उत्पादन यायचे. पण अमर यांना ऊसाचे जास्त उत्पादन घ्यायचे होते, त्यामुळे त्यांनी तज्ञांचे मार्गदर्शन घेतले. तेव्हा एकेरी उत्पादन त्यांनी ६० टनांपर्यंत नेले, पुढे तेच उत्पन्न ९० टनावर गेले. आता त्याच ऊसाचे उत्पादन त्यांनी १३० वर नेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.