आश्चर्यम्! युट्युबवर पाहून सुरु केली शेती, आता करतोय करोडोंची कमाई

0

 

शेती करताना अनेकदा शेतकरी युट्युबवर वेगवेगळे प्रयोग बघत असतात, काही जणांचे ते प्रयोग यशस्वी होतात, तर काहींचे नुकसान होते. पण आज आम्ही तुम्हाला अशा शेतकऱ्याची गोष्ट सांगणार आहोत ज्याने युट्युबवर शेतीचा प्रयोग बघितला आणि तशी शेती करुन तो आता १ करोड रुपयाची कमाई करत आहे.

उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्याच्या दौलतपुर गावामध्ये राहणाऱ्या या शेतकऱ्याचे नाव अमरेंद्र प्रताप सिंग असे आहे. अमरेंद्र व्यवसायाने एक शिक्षक आहे, पण आता ते शेती करत असून महिन्याला लाखो रुपयांची कमाई करत आहे.

अमरेंद्र यांनी २०१४ मध्ये शाळेच्या सुट्ट्यांमध्ये शेती करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी शेती करताना युट्युबचा पुरेपुर वापर केला. त्यांनी युट्युबमधून वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांची माहिती घेत तिथूनच शेती कशी करायची हे शिकले.

त्यानंतर त्यांनी पारंपारिक शेती न करता फळभाज्यांची शेती करण्याचा निर्णय घेतला. कारण तिथे मोठ्याप्रमाणात पारंपारिक शेती केली जाते आणि ती शेती करत असताना उत्पन्न मिळण्यास वेळ लागते, तसेच त्यासाठी खुप अडचणीही येतात.

त्यामुळे त्यांनी केळीची शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एक एकराच्या जमिनीवर केळीची शेती करण्यास सुरुवात केली. त्यांना या प्रयोगातून चांगलेच यश मिळाले. नंतर त्यांच्या लक्षात आले की अदरक, फ्लॉवर आणि हळदीच्या उत्पन्न मोठ्या प्रमाणात मिळते.

अमरेंद्र यांनी शेतात अदरकची लागवड केली, त्यातून त्यांचा एवढा फायदा झाला नाही पण त्यांनी जेव्हा हळदची लागवड केली. तेव्हा त्यातून त्यांची चांगलीच कमाई झाली.

आज अमरेंद्र यांची ६० एकरची जमिनीवर शेत करतात. त्यामध्ये ३० एकर शेतीवर फळ आणि भाज्यांची लागवड करतात, तर बाकीच्या ३० एकरवर अमरेंद्र पारंपरिक पिकांची लागवड करतात. यंदाच्या वर्षी त्यांनी १ करोड रुपयांची कमाई केली आहे तर दरवर्षी त्यांना ३० लाखांचे उत्पन्न मिळते.

Leave A Reply

Your email address will not be published.