नोकरी सोडून ‘हा’ तरुण करतोय शेती; वाचा वेगवेगळे प्रयोग करून कसे कमवतोय महिन्याला लाखो रुपये

0

 

आजकाल शेतीकडे कष्टाचे काम म्हणून बघितले जाते. त्यामुळे गावातील अनेक लोक शहराकडे येऊन नोकरी मिळवण्यासाठी धडपड कराताना दिसून येतात, पण अजूनही काही तरुण शेतीकडे वळताना आपल्याला दिसून येत आहे.

आजची हि गोष्ट अशा एका तरुणाची आहे, ज्याने इंजिनिअरिंगचे शिक्षण पुर्ण असले तरी त्याची शेतीकडे असल्याने तो आपल्या गावी शेती करताना दिसत आहे.

राधानगरीत राहणाऱ्या या इंजिनिअर तरुणाचे नाव अक्षय चौगले असे आहे. अक्षयने आपली इंजिनिअरिंगची नोकरी सोडून आजोबांच्या आणि वडिलांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक पद्धतीचा वापर करुन शेती करत आहे.

अक्षय नेहमीच आपल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करताना दिसून येतो, त्या वेगवेगळ्या प्रयोगातून अक्षय लाखो रुपये कमवत आहे. त्याला लहानपणापासूनच शेती करण्याची आवड होती.

२०१२-१३ ला बारावीनंतर अक्षयने मॅकेनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्याने एका खाजगी कंपनीत नोकरी केली. पण त्या नोकरीत त्याचे मन रमत नव्हते. त्यामुळे त्याने हातातली नोकरी सोडली आणि अभ्यासपुर्ण आणि तांत्रिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेतला.

शेती करताना सुरुवातीला त्याने ग्रीनहाऊसच्या साहाय्याने जरबेरा फुलांची शेती केली आहे. हि शेती त्याने जवळपास पाच वर्षे केली. दोन गुंठ्यात करणाऱ्यात आलेल्या या शेतीतून अक्षयने लाखो रुपये त्याने कमवले.

अक्षय शेतात नेहमीच वेगवेगळे प्रयोग करु पाहतो. त्यामुळे त्याने पारंपारिक शेती करत, ऊस, झेंडूच्या विविध जातींच्या पीके घेतली आहे. तसेच नवीन प्रयोग करत १ वर्षासाठी त्याने शेवंतीच्या झाडांची लागवड केली होती.

लॉकडाऊनमध्ये त्याने स्वता:ची रोपवाटीका सुरु केली, त्यामध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना रोपे खरेदीपासून त्याची वाढ त्यासाठी लागणारे खत, औषधे फवारणी कशी करावी याचेही मार्गदर्शन अक्षय लोकांना करतो.

त्यासोबतच ते हंगामानुसार वेगवेगळ्या पालेभाज्या आणि फळे भाज्यांची रोपे तयार करुन विक्री करतात. कोबी, फ्लॉवर, मिरची, अशा विविध प्रकारची रोपेही त्याने तयार केली आहे.

मी रोपवाटीकेच्या माध्यमातून गेल्या पाच-सहा महिन्यात लाखांचा व्यवसाय केला आहे. आपण जर अभ्यासपुर्ण पद्धतीने शेती केली, तर शेतीमध्ये तोटा होण्याची शक्यता कमी असते, असे अक्षयने म्हटले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.