शेतीसाठी नोकरी सोडली म्हणून हसत होते, त्यालाच मोदींकडून मिळाला कृषी रत्न पुरस्कार

0

 

आजकाल अनेक लोक नोकरी मिळत नसल्याने शेती व्यवसायाकडे जाताना दिसून येतात, पण आज आम्ही अशा एका माणसाची गोष्ट सांगणार आहोत ज्या माणसाने बँकेची नोकरी सोडून शेती करण्यास सुरुवात केली आणि आता तो शेतीतून लाखोंची कमाई करत आहे.

बिहारमध्ये राहणाऱ्या या माणसाचे नाव अभिषेक कुमार आहे. त्यांनी शिक्षण पुर्ण करुन २००७ मध्ये मॅनेजमेंटची डिग्री घेतली. त्यानंतर त्यांना एचडीएफसी बँकेत नोकरी मिळाली, त्यासाठी त्यांना वर्षाचे ७ लाखांचे पॅकेज मिळाले. काही वर्षे काम केल्यानंतर त्यांना वर्षाला ११ लाखांचे पॅकेज मिळण्यास सुरुवात झाली.

अभिषेक यांना नोकरी करण्याची इच्छा होत नव्हती, त्यामुळे गावाला येऊन शेती करावी असे त्यांना वाटत होते. त्यांनी गावातील काही शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की पारंपारिक शेती करुन काही फायदा होत नाही.

जेव्हा अभिषेक महाराष्ट्रात आले तेव्हा त्यांनी पाहिले की महाराष्ट्रातील शेतकरी फुलांची शेती करुन चांगला नफा मिळवत आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची शेती बघून त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला.

अभिषेक यांनी घेतलेला निर्णय कुटुंबासाठी आश्चर्याच धक्काच होता. तसेच हातातली नोकरी सोडून शेती करत असल्यामुळे काही लोक त्यांच्यावर हसत होते. पण त्यांनी माघार घेतली नाही.

अभिषेक यांनी शेतात औषधी वनस्पती लावण्यास सुरुवात केली. त्यांनी लिमियम, जरबेरासारख्या वनस्पतींची लागवड केली. त्यांनी मलेरियाचे औषध निर्माण करणारी वनस्पती आर्टिमिसियाची सुद्धा लागवड केली होती.

अभिषेक यांनी फक्त औषधी वनस्पतींचीच लागवड नाही केली आहे, तर त्यांनी वेगवेगळ्या फुलांची शेती सुद्धा केली आहे. त्यांनी अडीच एकरमध्ये रजनीगंधाची शेती केली आहे, त्यातून त्यांना दीड लाखांची कमाई होते.

अभिषेक करत असलेल्या शेतीतून २ लाख फुलच्या बल्बची निर्मिती करत आहे, त्यातून सुद्धा त्यांची ५-६ लाख रुपयांची कमाई होत आहे. तसेच त्यांनी एक कंपनीची सुद्धा सुरुवात केली आहे. अशाप्रकारे ते महिन्याला २ लाखांची कमाई करत आहे. अभिषेक यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते कृषी रत्न पुरस्काराने सन्मानित सुद्धा करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.