काय सांगता! धमकीला घाबरून फरहानने बनवला होता ‘हा’ चित्रपट अन् त्यालाच मिळाला नॅशनल अवॉर्ड

0

 

बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, गायक अशी ओळख असणाऱ्या फरहान अख्तरचा आज ४७ वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने आज आपण जाणून घेऊया फरहान अख्तरच्या आयुष्यातल्या काही गोष्टी.

९ जानेवारी १९७४ मध्ये मुंबईला फरहान अख्तरचा जन्म झाला होता. फरहान प्रसिद्ध लेखक आणि गीतकार जावेद अख्तर आणि हनी इराणी यांचा मुलगा आहे. १७ वर्षाचा असतानाच त्याने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती.

२००१ मध्ये फरहानने ‘दिल चाहता है’ या चित्रपटापासून दिग्दर्शनास सुरुवात केली होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड सुद्धा मिळाला आहे. आजपण या चित्रपटाच्या गाण्यांची क्रेझ आहे.

हा चित्रपट बनवण्याने मागे सुद्धा एक गोष्ट आहे. असे म्हटले जाते की आपला महाविद्यालयाच्या शिक्षणानंतर फरहान काही वर्षे घरीच होता. तो दिवसभर वेगवेगळे चित्रपट बघायचा.

फरहानच्या या वागण्यावर एक दिवशी फरहानची आई खूप भडली आणि त्यांनी फरहानला घरातून हाकलून देण्याची धमकी दिली होती. त्यानंतरच फरहानने ‘दिल चाहता है’ हा चित्रपट बनवला होता.

वडील जावेद अख्तर लेखक असल्याने लेखन करणे तर त्यांच्या रक्तातच होते पण गायकी, दिग्दर्शन आणि अभिनय स्वतः शिकला आहे. फरहानने डॉन, रॉक ऑन, लक बाय चान्स, सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक केले आहेत. तर रॉक ऑन, लक बाय चान्स, कार्तिक कॉलिंग कार्तिकसारख्या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.

लोकांना फरहानचे गायन आणि अभिनय खूप आवडतो. त्याच्या जिंदगी ना मुलगी दोबारा आणि भाग मिल्खा भाग या चित्रपटातील अभिनयाला लोकांनी खूप पसंत केले आहे. जिंदगी ना मिलेगी दौबारा या चित्रपटासाठी फरहानला दोन वेळा नॅशनल अवॉर्ड सुद्धा मिळाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.