वडिलांना बनवायचे होते कलेक्टर पण २१ व्या वर्षीच ‘छोटी बहु’ बनली होती रुबीना दिलैक

0

बिग बॉसला त्यांचा सिजन १४ चा विजेता मिळाला आहे. रविवारी झालेल्या ग्रँड फिनालेमध्ये बिग बॉसची ट्रॉफी रुबीनाला मिळाली आहे. रुबीना बिग बॉसमधील एक दमदार आणि खूप पॉप्युलर कंटेस्टंट बनली होती.

तिच्या चाहत्यांनी तिला भरभरून प्रेम दिले आणि ती विजेता ठरली आहे. रुबीना बिग बॉसच्या घरात आपल्या पतीसोबत आली होती. आज आम्ही तुम्हाला तिच्याबद्दल काही माहिती सांगणार आहोत. छोट्या पडद्यावरील छोटी बहु म्हणजे रुबीना दिलैक हे टेलिव्हिजनवरील खूप प्रसिद्ध नाव आहे.

रुबीनाचा जन्म २६ ऑगस्ट १९८७ ला झाला होता. रुबीनाने २०१८ मध्ये अभिनेता अभिनव शुक्लाबरोबर डेस्टिनेशन वेडिंग केली होती. दोघांनी बिग बॉसच्या घरात एकमेकांना साथ दिली होती. रुबीनाने टेलिव्हिजन शो शक्ती: अस्तित्व के एहसास की यामध्ये किन्नरचे पात्र निभावले होते. यानंतर ती घराघरात प्रसिद्ध झाली.

रुबीनाच्या वडीलांना तिला कलेक्टर होताना पहायचे होते पण तिच्या नशिबात काहीतरी वेगळेच लिहिले होते. रुबीनाने दोन ब्युटी स्पर्धा जिंकल्या आहेत. ती मिस शिमला २००६ आणि मिस नॉर्थ २००८ ची मानकरी आहे.

तिने छोटी बहु या मालिकेपासून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. यानंतर बनू मैं तेरी दुल्हन, सात फेरे-सलोनी का सफर, पवित्र रिश्ता, कसम से, सास बिना ससुराल, पुनर्विवाह-एक नई उम्मीद, जिनी और जूजू और देवों के देव महादेव यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तिने उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली.

रुबीना आपल्या फिटनेसवर खूप जोर देते. टीव्हीवर साधी दिसणारी रुबीना खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर जर तुम्ही तिचे फोटो पाहिले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. तिच्या जुन्या फोटोमध्ये तर तुम्ही तिला ओळखूसुद्धा शकणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.