..त्यामुळे सेट मॅक्स चॅनेलवर वारंवार सुर्यवंशम चित्रपट दाखवतात, वाचून आश्चर्य वाटेल

0

सोशल मिडीयावर रोज नवनवीन मीम्स व्हायरल होत असतात. मीम्स बनवणाऱ्यांना फक्त एक विषयच पाहिजे असतो मग काय इतके मीम्स व्हायरल होतात की विचारूच नका. हे लोक कोणालाच सोडत नाहीत. मग ते राजकारणी असो, कलाकार असो, सेलीब्रिटी असो इ. विषयांना घेऊन नेटकरी मीम्स बनवत असतात.

सोशल मिडीयावर कोणतीही बातमी व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. जर तुम्ही देखील सोशल मिडीया युजर असाल तर तुम्हाला सोशल मिडीयावर सुर्यवंशम चित्रपटाचे मीम्स दिसले असतील. त्याचे मुख्य कारण आहे की सुर्यवंशम चित्रपट वारंवार सेट मॅक्स या चॅनलवर दाखवला जातो. त्यामुळे लोक या चित्रपटाची थट्टा उडवत असतात.

पण अजूनही हा चित्रपट सेट मॅक्सवर दाखवला जातो. पण यापलिकडे या चित्रपटाचे आणि सेट मॅक्सचे एक नाते आहे. यामागे एक खुप मनोरंजक कथा आहे. आज आम्ही तुम्हाला याचे कारण सांगणार आहोत. बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला असेल की नेमका हाच चित्रपट सेट मॅक्सवर का लागतो? चॅनलवाले का हा चित्रपट वारंवार दाखवतात? तर तुमच्या माहितीसाठी १९९९ मध्ये सुर्यवंशम हा चित्रपट रिलीज झाला होता.

त्याच वर्षी सेट मॅक्स हा चॅनेल लॉन्च झाला होता. म्हणजे चित्रपट आणि चॅनेल एकाच वर्षी रिलीज झाले होते. चित्रपट २१ मे १९९९ ला रिलीज झाली होती आणि सेट मॅक्स डिसेंबर १९९९ मध्ये लॉन्च झाला होता. याच्याव्यतिरीक्त सगळ्यात आधी या चित्रपटाचे वर्ल्ड टीव्ही प्रिमीयर याच सेट मॅक्स चॅनेलवर झाले होते.

त्यावेळी या चित्रपटाला पाहण्यासाठी सगळ्या लोकांनी सेट मॅक्स चॅनेलला ट्युन केले होते. पहिल्यांदाच या चित्रपटामुळे चॅनेलची टीआरपी खुप वाढली होती. या चित्रपटामुळे सेट मॅक्स चॅनेल खुप प्रसिद्ध झाला होता. तेव्हापासून हा चित्रपटसुद्धा सेट मॅक्सचा फेवरेट बनला. त्यामुळे आठवड्यातून एकदातरी सेट मॅक्सवर सुर्यवंशम चित्रपट दाखवलाच जातो.

आपल्या जुन्या दिवसांना आठवण्यासाठी सेट मॅक्सवर हा चित्रपट दाखवलाच जातो. सध्या सेट मॅक्स चॅनेल खुप पॉप्युलर झाला आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी डबल रोल केला आहे. अमिताभ यांना या चित्रपटातील भुमिकेसाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत आणि त्यावेळी त्यांची खुप प्रशंसा केली गेली होती.

खुप कमी लोकांना माहित आहे की या चित्रपटात अमिताभ यांच्या आईचा आणि त्यांच्या पत्नीच्या आवाजाची डबिंग रेखाने केली आहे. आम्हाला आशा आहे की हा लेख वाचल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. त्यामुळे आता पुन्हा जर सेट मॅक्सवर सुर्यवंशम चित्रपट लागला तर विचारात पडू नका. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.