कमी वयात हे दोन भाऊ करताय तुफान कमाई, व्यवसाय करण्याची पद्धत पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

0

 

आजकाल बाजारात मिळणाऱ्या चहाचे खूप वेगवेगळे प्रकार आले आहे, कुठे जायका, कुठे येवले अमृत्यूल्य, तर कुठे प्रेमाचा चहा. पण आज आम्ही तुम्हाला एक्सप्रेस चहाची गोष्ट सांगणार आहोत.

दोन भावांनी मिळून तयार केलेला एक्सप्रेस चहा त्यांना चांगलीच कमाई करुन देत आहे. कमळेश्वर तालुक्यातील ब्राम्हणी फाट्याजवळ राहणारे भारत पराये (२३) आणि ऋतिक पराये (२०) यांनी एक्सप्रेस चहाची सुरुवात केली आहे. हा चहा सुरु करण्यामागची पण एक हटके गोष्ट आहे. चला मग जाणून घेऊया एक्सप्रेस चहाची गोष्ट…

कोरोनाच्या संकटात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या त्यामुळे अनेक जण नैराश्यात गेले होते. पण काहींनी या संकटाचा संधी म्हणून उपयोग केला. त्यातलेच हे दोघे भाऊ. या दोन्ही भावांनी लॉकडाऊनमध्ये चहा विक्रीचा व्यवसाय सुरु केला.

त्यांनी तयार केलेला चहा उत्तमदर्जेचा असल्याने पुर्ण कमळेश्वरकरांना त्याची चांगलीच भुरळ घातली आहे. आता दोघे भाऊ चहाची विक्री करुन महिन्याला हजारोंची उलाढाल करत आहे.

मोठा भाऊ भारतने कॉमर्सची डिग्री घेतली आहे, तर लहान भाऊ ऋतिकने बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. परिस्थिती गरिबीचीच आहे. वडिलांचे निधन घरात कमवणारे कोणीच नाही, त्यामुळे शिक्षण सोडून व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

लॉकडाऊन काळात चहाची सर्व दुकाने बंद होती, त्यामुळे त्यांनी चहाचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी घरीच चहा बनवला सरकारी आणि खाजगी कार्यालयात चहा विकण्यास सुरुवात केली.

चहा हव्या त्या ठिकाणी मिळत असल्याने चहाची मागणी वाढली. त्यांना आता दिवसाला ५०० कपची ऑर्डर्स मिळत आहे. लॉकडाऊन काळात त्यांची दिवसाला ३ हजार रुपयांची कमाई होत होती.

चहा पिण्यासाठी प्रत्येक वेळेस फोन करुन ऑर्डर देण्यापेक्षा त्यांनी ग्राहकांसाठी व्हॉट्सअ‌ॅपवर ऑर्डर घेण्यास सुरुवात केली त्यांच्या या भन्नाट कल्पनेमुळे त्यांच्या ग्राहकांमध्येही दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. आणखी पैसे जमा झाल्यानंतर लवकरच ते हॉटेल सुरु करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.