गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी करावा लागत होता १० तास प्रवास, त्यातून मार्ग काढत झाला अब्जाधीश

0

 

 

कोरोनाच्या संकटात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहे, तर अनेक लोकांच्या कंपन्या सुद्धा बंद पडल्या आहे पण अशाच स्थितीत सर्वात जास्त फायदा झाला आहे, तो म्हणजे डिजिटल पद्धतीने काम करणाऱ्या कंपन्यांचा.

लॉकडाऊनमुळे तर सर्वच शिक्षण ऑनलाईन झाल्यामुळे सर्वांची झुमवरच भरलं आहे. अनेक मिटींग झुम वरच भरत आहे. पण तुम्हाला माहित आहे का? लॉकडाऊनमुळे झुम कंपनीच्या मालकाच्या संपत्तीत इतकी वाढ झाली आहे, की तो आता श्रीमंतीच्या बाबतीत जगात १३० व्या क्रमांकावर आला आहे.

झुम ऍप हे चिनी व्यवसायिक एरिक युवान यांचे आहे. पण झुम ऍप ही एक अमेरिकन कंपनी आहे. १९७० मध्ये जन्म झालेल्या एरिक यांचे बालपणण चीनमध्येच होते.

युवान यांचे वडिल हे एक इंजिनियर होते. त्यामुळे त्यांना पहिल्यापासून टेक्नॉलॉजीचे आकर्षण होते, तसेच ते शाळेत सुद्धा हुशार होते. वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयात शिकत असताना एक सॉफ्टवेअर तयार केले होते.

२७ वर्षाच्या वयात १९९७ मध्ये एरिक हे सिलिकॉन व्हॅलीला गेले. त्याआधी त्यांनी ४ वर्षे जपानमध्ये काम केले होते. त्यांना अमेरिकत जायचे होते पण त्यांना तब्बल आठवेळा नकार मिळाला होता, पण अखेर त्यांना विजा मिळाला.

अमेरिकेत गेल्यावर त्यांनी वेबएक्स कंपनीत प्रोग्रामर म्हणून काम करण्यास सरुवात केली. असे असताना वेबएक्सला सिस्को सिस्टिम्स कंपनीने खरेदी केले तर युवान इंजिनियरिंग डिपार्टमेंटचे चीफ झाली.

सिस्को कंपनीच्या अधिकाऱ्यांना २०११ मध्ये एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ऍप तयार करण्याची कल्पना सुचली. हे एक असे ऍप होते फक्त कॉम्पुटरवर नाही तर मोबाईलवर सुद्धा चालेल.

खरंतर ही कल्पना युवानची होती. पण ही आयडिया कंपनीतल्या अधिकाऱ्यांना आवडली नाही, त्यामुळे युवान यांनी कंपनीचा राजीनामा दिला. त्यांच्याकडे झुम ऍप सुरु करण्यासाठी पैसे नव्हते तर त्यांनी मित्रांकडून पैसे घेऊन ऍप सुरु केले.

युवान यांना हि आयडिया महाविद्यालयातच सुचली होती. युवान यांना त्यांच्याकडे गर्लफ्रेंडला भेटायला जायचे असायचे तेव्हा त्याला प्रवासासाठी १० तास लागायचे. तेव्हाच त्यांना झुम ऍपची कल्पना सुचली होती.

आज त्यांची ही कल्पना चांगलीच फायद्याची ठरत आहे. एकवर्षापुर्वी जगात श्रीमंत व्यक्तींमध्ये २९३ व्या स्थानावर असणारे युवान आता जगात श्रीमंत व्यक्तींमध्ये १३० व्या क्रमांकावर आले आहे. खाजगी आयुष्यात सुद्धा ते खुप खुश असून ते त्यांची पत्नी आणि तीन मुलांसोबत राहतात. त्यांची संपत्ती १४ बिलियन युएस डॉलर इतकी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.