एकेकाळी कंपनीतून काढून टाकण्यात आले होते एलन मस्क यांना; आज आहे जगातील सर्वात श्रीमंत माणूस

0

 

स्पेसएक्स आणि टेस्लाचे मालक एलन मस्क गुरुवारी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे. त्यांनी ऍमेझॉन कंपनीचे मालक जेफ बेजोस यांना श्रीमंतीत मागे टाकून श्रीमंत व्यक्ती बनले आहे.

गुरुवारी अचानक मस्क यांची इलेक्ट्रीक कार असणारी कंपनी टेस्लाचे शेअरच्या किंमतीत अचानक वाढ झाली. ही वाढ ४.८ इतकी होती. त्यामुळे ब्लुमबर्गच्या अहवालानुसार एलन मस्क १८८.५ बिलियन डॉलरच्या संपत्तीसह जगातील ५०० सगळ्यात श्रीमंत व्यक्तींमध्ये पहिल्या स्थानावर पोहचले आहे.

दक्षिण आफ्रिकेत जन्म घेणाऱ्या एलन मस्क यांच्याकडे अमेरिका, कॅनेडा आणि साऊथ आफ्रिका या तीन देशांचे नागरिकत्व आहे. ते जेव्हा २८ वर्षांचे होते तेव्हा त्यांनी पहिली कंपनी x.com ची स्थापना केली होती. त्यानंतर हिच कंपनी पेपाल म्हणून ओळखली गेली.

एलन मस्क यांचा जन्म २८ जून १९७१ मध्ये झाला होता. त्यांचे वडिल इंजिनियर आणि पायलट होते. तर त्यांची आई एक मॉडेल होती. खेळण्याच्या वयात १० तास एलन मस्क पुस्तक वाचायचे. ८ वर्षाच्या वयात त्यांनी शाळेच्या लायब्ररीतील जवळपास सर्व पुस्तके वाचून काढली होती.

मस्क ९ वर्षाचे असताना त्यांचे आई-वडिल वेगवेगळे झाले. तेव्हा एलनने आपल्या वडिलांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. एलन ९ वर्षाचा असताना त्याने पहिला ब्लास्टर नावाचा व्हिडिओ गेम बनवला होता. हा गेम विकून त्यांना ५०० डॉलर मिळाले होते.

त्यांना लहानपणापासूनच आपल्या वडिलांपासून खुप काही शिकायला मिळाले. १७ वर्षाचे असताना ते कॅनेडाला शिकायला गेले. आई कॅनेडाला राहत असल्याने त्यांना कॅनेडाचे नागरिकत्व पण लगेच मिळाले. शिक्षण घे असताना ते आपला खर्च काम सुद्धा करायचे.

स्टॅनफोर्ड युनिवर्सिटीत प्रवेश घेतल्यानंतर दोन दिवसातच युनिवर्सिटीला रामराम ठोकला आणि त्यांनी आपल्या भावासोबत मिळून सॉफ्टवेअर बनवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांनी zip2 नावाने कंपनी उघडली, पण तीन वर्षात त्यांनी कंपनी विकून टाकली.

१९९९ मध्ये त्यांनी x.com नावाने एक ऑनलाईन बँक कंपनी सुरु केली. त्यासोबतच त्यांनी Confinity नावाच्या एका कंपनीलाही त्यांनी जोडून घेतले होते. पण मस्क यांना मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा ते लग्नानंतर फिरायला गेले असताना त्यांना या कंपनीतून काढून टाकण्यात आले.

कंपनीतून काढून टाकण्यात आल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला होता. पण ते खुप मेहनती आणि हुशार होते. त्यामुळे त्यांनी अंतरिक्षच्या क्षेत्रात पाय ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अंतरिक्षमध्ये जाण्यासाठी रॉकेट बनवण्याचा विचार केला.

त्यांनी माहिती मिळवण्यासाठी वेगवेगळी पुस्तके वाचली. रशियात त्यांना असे लक्षात आले की रॉकेटची किंमत खुप जास्त आहे, त्यामुळे त्यांनी स्वता:च रॉकेट बनवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांनी स्पेसएक्स कंपनीची स्थापना केली. या कंपनीत त्यांना चांगलेच यश मिळाले.

पुढे त्यांनी इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी टेस्लामध्ये गुंतवणुक केली. २०१२ मध्ये मस्क यांनी इलेक्ट्रिक गाड्यांना चार्ज करण्यासाठी सुपरचार्जरची निर्मिती केली. जमिनिच्या खालून धावणारी सर्वात फास्ट ट्रेन हायपरलुप ट्रेनची निर्मितीदेखील त्यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.