बघा, ‘या’ माणसाने डोकं लावून स्वता:च केली वीज निर्मिती; सोशल मीडियावर होतोय व्हायरल

0

भारतात अनेक जुगाडू लोक आपल्याला दिसून येतात. त्यांच्या जुगाडमुळे सोशल मीडियावर ते चांगलेच व्हायरल होताना दिसतात. अशात आता कर्नाटकच्या एका शेतकऱ्याचा जुगाड चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

कर्नाटकच्या एका शेतकऱ्याने स्वता:चे डोक लावून वीजनिर्मिती करणारे तंत्र तयार केले आहे. या शेतकऱ्याचे नाव सिदप्पा असे आहे. त्याने वीजनिर्मिती करण्यासाठी एक वॉटरमिल तयार केली आहे. सिदप्पाच्या वॉटरमिलचा फोटो चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

सिदप्पाने प्लॅस्टिक ट्युब आणि लाकडाचा उपयोग करुन हि टिकाऊ आणि स्वस्त वॉटरमिल तयार केली आहे. या वॉटरमिलद्वारे कालव्यात पाणी गेल्यास १५० व्हॅट वीज तयार होते. या वॉटरमिलला फक्त ५ हजार रुपये खर्च आला आहे.

सिदप्पा यांचे घर अत्यंत दुर्गम भागात आहे. त्यामुळे तिथल्या दुर्गम भागात हुबळी इलेक्ट्रीकल कंपनी आपली सेवा देऊ शकत नव्हती. अशात सिदप्पा यांनी स्वता:च वीज निर्मिती करण्याचा विचार केला. त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी जमा करुन वॉटरमिल बनवली.

त्यांच्या घराशेजारी कालवा असल्याने त्यांनी त्याचाच वापर करण्याचे ठरवले होते. आता जेव्हा पण त्यांच्या तिथल्या कालव्याला पाणी येते, तेव्हा सिदप्पा वीज निर्मिती करतात.

सिदप्पा यांच्या या हटके जुगाडामुळे अनेकांचे लक्ष त्यांनी वेधून घेतले आहे. तसेच भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू व्ही व्ही एस लक्ष्मण यांनीदेखील सिदप्पा यांचा हा फोटो शेअर केला आहे.

अविश्वसनीय, कर्नाटकच्या ग्रामीण भागातील शेतकरी सिदप्पा यांनी वीजनिर्मिती करण्यासाठी वॉटरमिल तयार केली आहे. ही वॉटरमिल तयार करण्यासाठी ५ हजार खर्च आला आहे. या वॉटरमिलद्वारे १५० व्हॅट वीजनिर्मिती केली जाते, असे ट्विट करत लक्ष्मण यांनी सिदप्पा यांचा फोटो शेअर केला आहे.

सिदप्पा यांच्या या जुगाडाचे देशभरात कौतूक केले जात आहे. तर अनेक नेटकऱ्यांनी सिदप्पा यांचा हा फोटो शेअर करत, हे प्रेरणादायी असल्याचे म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.