मी CA होणारच..! दारात वडिलांचा मृतदेह असताना दिली परीक्षा, कुटुंबासाठी मंगलचा मोठा संघर्ष

0

पुणे | समाजात वावरताना परिस्थितीची कारणं सांगणारे अनेक जण पहायला मिळतात. परंतु त्यावर मात करत संकटांनाही आपल्या जिद्दीपुढे झुकवणारी उदाहरण फार कमीच असतात. शुन्यातून भरारी घेऊन स्वत: खुप मोठं जग निर्माण करणं ही अनेकांना प्रेरणा देणारी बाब आहे.

मंगल शंकर गायकवाड या तरुणीचा प्रवास हा असाच आत्मविश्वासाने आणि प्रेरणेने भरलेला आहे. ती पुण्यातील लोहियानगर झोपडपट्टीमध्ये राहते. ‘सलाम पुणे’ नं मंगलचा प्रेरणादायी प्रवास सर्वांसमोर आणला आहे.

‘सलाम पुणे’ नं इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. मंगलचा संघर्ष आणि त्यामधून तिने काढलेली प्रेरणादायी वाट कौतुकास्पद आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही तिच्या स्वप्नांच आणि जिद्दीचं कौतुक करणार याची खात्री आहे.

“आजवर माझ्या घरच्यांनी जे भोगलं आहे त्यातून मला त्यांना बाहेर काढायचं आहे, चांगलं आयुष्य द्यायचं आहे. माझी पुढची पिढी, तिचं जगण माझ्याहून सुखाचं झालं पाहिजे, कष्ट कमी झाले पाहिजेत हे माझं ध्येय आहे”. अशी जिद्द ठेवून मंगल तिच्या कुटुंबासाठी मोठा संघर्ष करत आहे.

मंगल सीए म्हणजे चार्टर्ड अकाउंटन्सीचा कोर्स करत आहे. आता ती सीए या परीक्षेच्या अंतिम टप्प्यात पोचली आहे. परंतु तिचा इथपर्यंतचा प्रवास अत्यंत खडतर आहे. याबाबत ती व्हिडीओत व्यक्त होताना दिसते.

मंगलला पाऊला-पाऊलावर अर्थिक परिस्थितीला तोंड द्याव लागत आहे. तर दुसरीकेडे कुटुंबाचं घर झोपडी पुनर्वसन योजनेअंतर्गत तोडले गेले आहे. तरीही ती सगळ्या संकटांवर मात करत पुढे जात आहे.

विशेष म्हणजे काही काळापुर्वी तिच्या वडिलांच निधन झालं. त्यांचा मृतदेह दारात असताना काळजावर दगड ठेवत परिक्षा दिली. तिनं स्वत:च्या शिक्षणात अनेक संकट आली तरी काका आणि शिक्षकांच्या मदतीने खंड पडू दिला नाही. अशी ही मंगल सर्वांसाठी प्रेरणा ठरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.