आईच्या डोळ्यातील पाणी बघून बदलण्याचा निर्णय घेतला, आज आहे सगळ्यात महागडा अभिनेता

0

ड्वेन जॉनसन किंवा द रॉक जर तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला माहित असेल की द रॉक हा हॉलिवूडमधील एक खुप मोठा स्टार आहे. त्यांनी आपल्या करिअरला सुरूवात WWE मधून केली होती आणि आज रॉक जगातील सर्वात महागडा अभिनेता आहे.

त्यांनी रेसलिंगमध्ये आपली कला दाखवून अनेकांचे मन जिंकले होते. त्यानंतर त्यांनी रेसलिंग सोडून दिली आणि हॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. पण जीवनात रॉकलाही खुप संघर्ष करावा लागला आहे.

आज आम्ही तुम्हाला त्याच्या जीवनातील काही रोमांचक गोष्टी सांगणार आहोत. आपल्या भल्यामोठ्या शरीराला सांभाळण्यासाठी रॉक दिवसातून ७ वेळा जेवण करतात. त्यांच्या जेवणात ब्रोकली, अंडी, मासे, भात, बटाटे आणि अनेक भाज्यांचा सामवेश असतो.

रॉकला कॉड मासा खुप आवडतो त्यामुळे त्यांच्या आहारात या माशाचे समावेश नक्कीच असतो. रॉक एक दिवसात ५ हजार कॅलरीचा आहार घेतात. सामान्य माणसाच्या तुलनेत हा आहार दुप्पट आहे. रॉक जेव्हा १४ वर्षांचे होते तेव्हा त्यांना आणि त्यांच्या परिवाराला एक छोट्या अपार्टमेंटमधून हाकलून लावण्यात आलं होतं.

त्यानंतर पैसे कमावण्यासाठी रॉकने गुन्हेगारी क्षेत्रात पाऊल ठेवले होते. त्यांच्यावर अंगठी चोरण्याचा आरोप होता. त्यांच्यावरचा तो आरोप खरा निघाला आणि त्यानंतर त्यांची आई खुप रडली होती. त्यांना यासाठी कोठडीची शिक्षाही झाली होती.

आपल्या आईला पाहिल्यानंतर त्यांनी बदलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रॉक यांनी आपल्या बॉडीवर लक्ष केंद्रित केले. भलेही रॉकने गुन्हेगारी क्षेत्रात पाऊल ठेवले होते पण त्यांच्याकडे क्रिमीनोलॉजीची डिग्री आहे.

रॉक यांनी मायामी हरिकेंससाठी फुटबॉलदेखील खेळले आहे. त्याचवेळी त्यांनी आपले शिक्षण पुर्ण केले होते. १९९५ मध्ये त्यांनी मियॉमी युनिव्हर्सिटीमधून क्रिमिनॉलॉजी आणि फिजिओलॉजी ची डिग्री घेतली होती.

पण त्यांनी आपल्या डिग्रीचा वापर नोकरीसाठी केला नाही. पण त्यांच्याकडे ताकद, टॅलेंट आणि बुद्धी तिन्हीपण आहे. रॉक जेव्हा २३ वर्षांचे होते तेव्हा त्यांना फुटबॉलच्या टीममधून बाहेर काढण्यात आले होते.

तेव्हा रॉक डिप्रेशनचे शिकार झाले होते. ते इतके दुखी झाले होते की त्यांनी घरातून बाहेर निघायचे बंद केले होते. पण नंतर त्यांना टीममध्ये पुन्हा घेण्याची ऑफर आली होती पण त्यांनी ती ऑफर स्वीकारली नाही.

त्यावर बोलताना रॉक म्हणाले की त्यावेळी माझा सांभाळ करणारं कोणच माझ्या जवळ नव्हतं. तुम्ही जर फास्ट ऍण्ड फ्युरिअस चित्रपट पाहिला असेल तर तुम्हाला दिसेल की रॉक यांनी एका एफबीआय एंजंटचा रोल केला आहे.

रॉकच्या आधी ही भुमिका प्रसिद्ध अभिनेता टॉमी ली याला भेटणार होती. पण रॉकच्या चाहत्यांनी जोर धरला की ही भुमिका रॉकलाच द्यायला हवी. त्यानंतर हा निर्णय निर्णय घेण्यात आला आणि त्यांचा हा निर्णय बरोबर निघाला. चित्रपटाने खुप कमाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.