डॉ. अब्दुल कलामांनी ‘या’ वैज्ञानिकाच्या मार्गदर्शनाखाली सुरु केली होती आपली अंतरिक्ष क्षेत्रातील कारकिर्द

0

 

 

डॉ. विक्रम साराभाई यांची आज पुण्यतीथी. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोची मुहूर्तमेढ देखील साराभाई यांनीच रोवली होती. त्यामुळेच त्यांना भारतीय अंतराळ युगाचे शिल्पकार असेही म्हटले जाते.

साराभाई यांनी भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्रात महत्वाचे संशोधन केले होते. त्यांचा जन्म गुजरातच्या अहमदाबाद येथे झाला होता. त्यांच्या कुटूंबात कोणीही राजकारणात सक्रिय नव्हतं तरी देखील सामाजिक, राजकीय आणि कला क्षेत्रातील दिग्गज लोकांचे त्यांच्या घरी येणं जाणं सुरु असायचे.

त्यांच्या घरी जवाहरलाल नेहरु ते अगदी महात्मा गांधी सुद्धा त्यांच्या घरी येत असे. रविंद्रनाथ टागोरांनी तर त्यांच्या शिक्षणासाठीही मदत केली होती, रविंद्रनाथ टागोर यांनी साराभाई यांना विशेष मार्गदर्शन देखील केले होते.

साराभाई यांच्यासह ते एकूण आठ भावंड होती. त्यामुळे आई सरलादेवी यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी माँटेसरी पद्धतीची शाळा सुरु केली होती.

साराभाई यांना आधीपासूनच गणित, भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्रात आवड होती. त्यामुळे पुढच्या शिक्षणासाठी त्यांनी ब्रिटनला जाण्याचे ठरवले. ते १९३७ मध्ये ब्रिटनला गेले सुद्धा पण दुसरे विश्वयुद्ध सुरु असल्याने त्यांना पुन्हा भारतात परतावे लागले.

जेव्हा १९४७ मध्ये दुसरे महायुद्ध संपले तेव्हा ते पुन्हा शिक्षणासाठी ब्रिटनला गेले. तिथे गेल्यानंतर कॉस्मिक रे इनवेस्टीगेशन इन ट्रॉपिकल लॅटिट्युड्स या विषयात साराभाई यांनी संशोधन करुन डॉक्टरेट मिळवली होती.

ब्रिटनमधून परतल्यानंतर ११ नोव्हेंबरला १९४७ रोजी डॉ. साराभाई यांनी फिसिकल रिसर्चची स्थापना केली होती. तिथुनच त्यांनी भौतिकशास्त्र, खगोलशास्त्राची संशोधनाची सुरुवात केली. तेव्हा त्यांचे वय फक्त २८ वर्षे होते.

पुढे त्यांनी अवकाश संशोधनात महत्वाची कामगिरी बजावली. साराभाई यांनी होमी भाभा यांच्या मदतीने देशातील पहिले रॉकेट लाँचिंग स्टेशन बनवले. तसेच इंडियन इन्स्टीट्युट ऑफ मॅनेजमेंटची (आयआयएम) स्थापना करण्यात पण साराभाई यांनी महत्वाची भुमिक बजावली होती.

१९६५ मध्ये पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडण्यात आला होता. त्याचे डिझाईन साराभाई यांनी अहमदाबाद रिसर्च सेंटरमध्ये केले होते. या उपग्रहाच्या यशानंतर अनेक उपग्रह सोडण्यात आले होते त्यामध्ये पण साराभाई यांचे अथक परिश्रम लपलेले होते.

भारताच्या चांद्रयान-२ मोहिमेत ‘विक्रम’ मून लँडरशी इस्त्रोचा अगदी शेवटच्या क्षणी संपर्क तुटला होता. या लँडरचे नाव डॉ. विक्रम साराभाई यांच्या नावावर देण्यात आले होते.

भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनीदेखील साराभाई यांच्याच मार्गदर्शनाखाली अंतरिक्ष विज्ञान क्षेत्रातील आपली कारकिर्द सुरु केली होती. भारताच्या वरिष्ठ वैज्ञानिकांची एक पिढी त्यांनी तयार केली होती. त्या लोकांनीदेखील भारताच्या वैज्ञानिक क्षेत्रात महत्वाची कामगिरी बजावली आहे.

साराभाई यांना १९६६ साली पद्मभुषण पुरस्कार देण्यात आला होता. तसेच त्यांना १९७२ साली मरणोत्तर पद्मविभुषण पुरस्कार देण्यात आला होता. ३० डिसेंबरला १९७१ साली ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.