उद्योगपती असावा तर असा! कर्मचाऱ्यांच्या आईवडिलांना पेन्शन, मुलांना शिष्यवृत्ती आणि पत्नींना वेतन

0

 

 

आपण अनेकदा एखाद्या कंपनीच्या मालकाला कर्मचाऱ्यांना बोनस देताना, बघतो. काही लोक तर आपल्या कर्मचाऱ्यांच्या कामावर खुश होऊन त्यांना पगार वाढ करतात, पण आता आम्ही तुम्हाला अशी बातमी सांगणार आहोत, ज्याच्याने तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

उद्योगपती डॉ. सोहन रॉय यांनी आता युएईमध्ये असणाऱ्या त्यांच्या कर्मचारांच्या पत्नींना आता वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. सोहन रॉय हे केरळचे उद्योगपती आहे.

असे पहिल्यांदाच झाले असेल की एखादा उद्योगपती आपल्या कर्मचाऱ्यांसोबत त्यांच्या पत्नींनाही वेतन देणार आहे. युएईच्या शारजानमध्ये राहणारे सोहन रॉय हे एयरिज ग्रृप ऑफ कंपनीजचे मालक आहे.

ही कंपनी सध्या कर्मचाऱ्यांच्या पत्नीचे डेटाबेस तयार करत आहे. कोणत्या गृहीणीला किती वेतन दिले जाईल हे कर्मचारी कंपनीत किती दिवसांपासून काम करत आहे, त्याच्यावर ठरवले जाणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांच्या पत्नींना जॉब नसेल त्यांना हे वेतन दिले जाणार आहे.

सोहन रॉय हे मूळ केरळमधले आहे. कंपनीसाठी कर्मचारी घेत असलेल्या मेहनतीचा परतावा म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. कोरोना संकटातही या कंपनीने कोणत्याही कर्मचाऱ्याला नोकरीवरुन काढले नाही किंवा पगारकपात केली नाही.

२०१२ मध्ये तत्कालीन महिला व बाल विकासमंत्री कृष्णा तीरथ यांनी एक प्रस्ताव मांडला होता, त्यात समाजात महिलांना आणखी सशक्त बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे म्हटले होते. त्याववरुनच सोहन रॉय यांना हि कल्पना सुचली.

सध्या एयरिज ग्रृप ऑफ कंपनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या आईवडीलांना पेन्शन देत आहे. या कंपनीतल्या ज्या कर्मचाऱ्यांना तीन वर्षे पुर्ण झालेली आहे, त्यांच्या आईवडीलांना हि पेन्शन लागू करण्यात आली आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी वार्षिक शिष्यवृत्तीही देण्यात आली आहै.

Leave A Reply

Your email address will not be published.