शीतल आमटे नैराश्यात होत्या याचा पुरावा स्वतः त्यांच्या आईवडिलांनीच दिला होता?

0

 

आनंदवन महारोगी सेवा समितीचे मुख्य अधिकारी आणि डॉ. बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे कराजगी यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी विषारी इंजेक्शन घेऊन शीतल आमटे यांनी आत्महत्या केली आहे. ३८ वर्षांच्या वयात शीतल आमटे यांचे निधन झाले आहे.

अलीकडेच त्यांनी समितीमधील पदाधिकारी आणि आमटे कुटुंबातील सदस्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यावर आमटे कुटुंबियांनी निवेदन जाहीर करून शीतल आमटे यांनी मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सांगितले होते.

२००४ मध्ये नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी एमबीबीएस केले आहे. पुढे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधून सोशल अँथ्रोपीनरची डिग्री घेतली होती. आनंदवनात अपंगात्वावरील डॉक्टर तज्ञ म्हणून त्यांनी काम सुरू केले.

शीतल आमटे यांना फोटोग्राफी आणि चित्रकलेचा छंद होता, विशेष म्हणजे आपल्या कामासोबतच त्या हा छंद सुद्धा जोपासत होत्या. शीतल आमटे यांचे पती गौतम कराजगी महारोगी सेवा समितीचे ट्रस्टी आहे.

२०१६ मध्ये महारोगी सेवा समितीची कार्यकारिणी जाहीर झाली होती, यात शीतल आमटे आणि गौतम कराजगी यांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आले होते. तेव्हापासून त्या महारोगी सेवा समितीच्या सीईओ पदावर कार्यरत होत्या.

भारतभरात अपंग असणाऱ्या लोकांसाठी ‘निजबल’ नावाचे सेंटर गौतम यांनी सुरू केलेले आहे. आनंदवन, सोमनाथ प्रकल्प, लोक बिरादरी प्रकल्प, लोकबिरादरी प्रकल्प नागेपल्ली, लोकबिरादरी प्रकल्प खमंचरू, अशोकवन प्रकल्प नागपूर, ग्रामीण विकास प्रकल्प मुळगव्हाण, ग्रामीण विकास प्रकल्प चेतीदेवळी, महारोगी सेवा समिती चंद्रपूर आणि ग्रामीण विकास संस्था वरोरा असे १० प्रकल्प महारोगी सेवा समितीच्या अंतर्गत येतात.

शीतल यांच्या या कामामुळे अनेकजण त्यांचे  कौतुक करायचे. काही दिवसांपासून त्या जास्तच चर्चेत आल्या होत्या. २० नोव्हेंबर २०२० ला फेसबुक लाईव्ह करून त्यांनी महारोगी सेवा समितीकडून केल्या जाणाऱ्या कामांवर आक्षेप घेतला होता.

कौस्तुभ आमटे, डॉ. प्रकाश आमटे तसेच त्यांच्या कुटुंबियांवरही शीतल आमटे यांनी काही आरोप केले होते, पण अर्ध्या तासातच शीतल आमटे यांनी ते संभाषण दिली केले होते. तसेच या संभाषणानंतर आमटे शीतल आमटे यांच्या वक्तव्याचा आमटे कुटुंबियांकडून निषेध करण्यात आला होता.

तसेच एक निवेदन जाहीर करत शीतल आमटे यांचे भाष्य तथ्यहीन असून त्या नैराश्यात आहे, असे सांगितले होते, या निवेदनावर शीतल आमटे यांचे वडील डॉ. विकास आमटे आणि आई भारती आमटे यांच्या सह्या होत्या.

अशात, दिवंगत बाबा आमटे यांच्या कार्याला मी आणि माझे पती पुढे नेत आहोत. लवकरच आम्ही एक निवेदन जाहीर करून आमची भूमिका जाहीर करू. मी फेसबुक लाईव्ह वरून माझे मत मांडले होते, पण मला तो व्हिडीओ डिलीट करण्यास भाग पाडले, असे शीतल आमटे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.

दरम्यान, सोमवारी शीतल आमटे यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले आहे. आनंदवनात ज्या ठिकाणी बाबा आमटे यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले त्याच्या शेजारीच शीतल यांच्यावर आनंदवनाच्या प्रथेनुसार अंतिम संस्कार करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.