९१ वर्षांचे आहे अनुष्काची डिलिव्हरी करणारे डॉक्टर; जाणून घ्या त्यांच्याबद्दलच्या काही रंजक गोष्टी

0

सध्या सगळीकडेच विराट आणि अनुष्काच्या बाळाची चर्चा सुरू आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना ११ जानेवारीला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. असे असताना ज्या डॉक्टरांनी अनुष्का शर्माची डिलिव्हरी केली आहे ते सुद्धा पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

अनुष्का शर्माची डिलिव्हरी प्रसिद्ध डॉक्टर रुस्तम सोनावाला यांनी केली आहे. मुंबईच्या बरीच कँडी रुग्णालयात अनुष्का शर्मा  डॉक्टर रुस्तम सोनावाला यांच्याकडे उपचार घेत होती.

सोनावाला हे तब्बल ९१ वर्षाचे आहे. वैद्यकीय क्षेत्रात सोनावाला यांचे नाव खूप आदराने घेतले जाते. वैद्यकिय क्षेत्रातल्या कामगिरीबद्दल त्यांना १९९१ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. वैद्यकीय क्षेत्रात त्यांना आर. पी. सोनावाला म्हणून पण ओळ्खले जाते.

त्यांनी अनेक अभिनेत्रींचे बाळंतपण केले आहेत. २०१६ मध्ये जन्म घेतलेल्या तैमुरची डिलिव्हरी सोनावाला यांनीच केले होते. इतकेच नाही तर करीना कपूर, करिश्मा कपूरची डिलिव्हरीसुद्धा सोनावाला यांनीच केली आहे

वयाचे ९० वर्ष पूर्ण केले असले तरी डॉक्टर सोनावाला आपल्या कारकिर्दीत सक्रिय आहे. त्यांनी आपली वैद्यकीय क्षेत्रातील प्रॅक्टिस १९४८ पासून सुरू केली होती.

सुरुवातीला डॉक्टर सोनावाला रुग्णांची नाडी पाहून उपचार करायचे. डायग्नोस्टिक प्रक्रिया आणि रक्तगटासारख्या गोष्टी नंतर आल्याचे सोनावाला यांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटले आहे. तसेच डॉक्टर सोनावाला यांनी इंट्रा गर्भाशय निरोधक या यंत्राचा शोध लावला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.