आईच्या पोटात असताना वडील वारले, झोपडीत राहणारा मुलगा कसा झाला कलेक्टर? वाचा यशोगाथा

0

आज आम्ही तुम्हाला अशा एका माणसाची यशोगाथा सांगणार आहोत ज्याने आपल्या कष्टाने यशाचे शिखर गाठले आहे. त्या माणसाचे नाव आहे डॉ. राजेंद्र गारूड. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील सामोडे गावात त्यांच्या जन्म झाला होता. त्यांचा जन्म एका भिल्ल वस्तीत झाला होता.

जेव्हा ते आईच्या पोटात होते तेव्हाच त्यांचे वडील त्यांना सोडून गेले होते. त्यांचे लहाणपण वस्तीतल्या एका लहाणश्या झोपडीत गेले होते. हाच मुलगा आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि अभ्यासाच्या जोरावर वेद्यकीय पदवी मिळवेल आणि पहिल्याच प्रयत्नात युपीएससी पास करेल असे कोणालाही वाटले नव्हते.

त्यानंतर त्यांनी आयएएसची पदवीही मिळवली. त्यांच्या आयुष्यात त्यांनी खुप संघर्ष केला. त्यावेळी त्यांच्या वस्तीत सगळ्यांच्या झोपड्या ह्या उसाच्या पाचटापासून बनवल्या होत्या. या भिल्ल वस्तीतील सर्वांचा व्यवसाय म्हणजे एकतर मजुरी करायची किंवा मग महूपासून दारू विकायची.

या दोनच गोष्टींवरून त्यांचा उदरनिर्वाह व्हायचा. या भिल्ल वस्तीत राजेंद्र यांचे वडील, आई आणि त्यांचे मोठे बहिण, भाऊ राहत असत. आईच्या पोटात असतानाच त्यांच्या वडीलांचे निधन झाले होते. त्यावेळी ते आईच्या पोटात होते आणि तीनच महिन्यांचे होते. वडीलांचा साधा फोटोही त्यांना पाहायला मिळाला नाही.

वडील वारले म्हणून त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या आईवर दबाव टाकण्यास सुरूवात केली की आधीच तुला तीन मुले आहेत मग आता हे चौथे मुल कशाला. त्यावेळी त्यांची मोठी मावशी समोर आली आणि म्हणाली तुम्हाला हे मुल नको हवे असेल तर त्याचा संभाळ मी करते.

मावशी हट्टाने त्यांच्या आईला घेऊन स्वताच्या झोपडीत घेऊन आली. आणि त्यानंतर त्याच झोपडीत त्यांचा जन्म झाला. ४ महिन्यातच आई मावशी मजूरीसाठी जायला लागल्या. राजेंद्र तेव्हा बाळ होते आणि ते दुधासाठी खुप रडायचे. दारूची भुक भागवण्यासाठी त्यांच्या तोंडात दारूचे दोन थेंब टाकले जायचे.

त्यामुळे ते लगेच झोपी जायचे. त्यांच्या घरात कधीच कोणी शाळाच बघितली नव्हती. पण त्यांच्या नशीबात मात्र काहीतरी वेगळेच लिहीले होते. शिक्षक त्यांच्या आदीवासी पट्ट्यात आले आणि त्यांना शाळेत घेऊन गेले. जिल्हा परिषदेच्या कौलारू शाळेत ते जाऊ लागले.

सर्व पांढऱ्या कपड्यात असायचे पण राजेंद्र एकटेच मळक्या कपड्यात असायचे. त्यांना हे चांगलं नव्हतं वाटत. पण मुख्यध्यापक त्यांना दुध आणि सुगडी द्यायचे त्यामुळे ते रोज शाळेत जायचे. शाळेत एकदा राजेंद्र बिना स्वेटरचे आणि बिना चप्पलचे भाषण करत होते. त्यावेळी खुप थंडी होती.

एका शिक्षकाने ते बघितलं व राजेंद्र घरी पोहोचायच्या आत त्यांनी त्यांच्या खरी चप्पल आणि स्वेटर आणून दिले. ट्युशन पर्यंत सगळा खर्च त्यांच्या शिक्षकांनीच केला. स्वताच्या पैशाने शिक्षक त्यांना शाळेत घेऊन गेले आणि त्यांचा नवोद्य विद्यालय अक्कलकुवा नंदुरबार येथे नंबर लागला.

त्यावेळी नुकतेच राजेंद्र यांच्या बहिणीचे लग्न झाले होते आणि भाऊ आश्रमात होता. त्यांची आई पहाटेच दारू गाळायला जात असे. तेव्हा राजेंद्र सकाळी उठल्यानंतर झाडू लावणे, पाणी भरणे, भांडी घासणे हे सर्व कामे करायचे. आजूबाजूला सर्व लोक तसेच होते त्यामुळे त्यांना गरीबी काय होती हे माहितच नव्हते.

जेव्हा ते नवोद्यला गेले तेव्हा त्यांची आई खुप रडायची. त्यांनी खुप अभ्यास केला व नंतर १० वीला ९७ टक्के मार्क्स मिळवले. त्यानंतर त्यांनी मुंबईच्या जी. एस. मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवला. स्कॉलरशिपच्या जोरावर त्यांचा शिक्षणाचा खर्च निघत होता.

त्यांची आईही थोडेफार पैसे पाठवायची. एम.बी.बी.एसच्या शेवटच्या वर्षाला असताना त्यांनी युपीएससीचा अभ्यास सुरू केला होता. १ वर्षांनी त्यांच्या हातात दोन निकाल होते. एक म्हणजे एम.एम.बी.बी.एसचा पास झाल्याचा निकाल आणि युपीएससची क्रॅक केल्याचा निकाल.

घरी मोठमोठे लेक अभिनंदन करण्यासाठी येत होते. नातेवाईक, भिल्ल समाजातील लोक आपला राजू कलेक्टर झाला म्हणून कौतुक करत होते. त्यांची पहिली पोस्टींग नंदुरबार येथे झाली होती. जर एखादे ध्येय गाठायचे ठरवले तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही हे त्यांनी दाखवून दिलं.

Leave A Reply

Your email address will not be published.