सलाम या तरुणीला, गोरगरीबांवर करतेय फक्त १० रुपयांत उपचार तेही २२ हजार भाडे भरुन

0

 

 

कोरोनाच्या संकटात रुग्णांची लूटमार होताना आपण बघितली आहे, वाढीव बिलामुळे अनेक रुग्ण त्रस्त झाले होते. पण काही डॉक्टर असेही असतात, जे गरजू आणि गरीब लोकांचा विचार करुन त्यांच्यावर उपचार करताना दिसतात, आजची गोष्ट अशाच एका डॉक्टर तरूणीची आहे.

आंध्र प्रदेशची एक डॉक्टर अशी आहे, जी रुग्णांचे उपचार फक्त १० रुपयांमध्ये करत आहे. या डॉक्टरचे नाव नूरी परवीन असे आहे. तिने गरीब आणि गरजू लोकांसाठी फक्त १० रुपयांत उपचार करण्यासाठी क्लिनिक सुरु केले आहे.

नूरीने एमबीबीएसचे शिक्षण घेतले आहे. तिने आपले हे क्लिनिक कडप्पामध्ये उघडले आहे. जे रुग्ण त्यांच्या आजारांचा पैशांआभावी उपचार करु शकत नाही, त्यांचा उपचार या दवाखान्यात फक्त १० रुपयांत केला जातो.

अनेक डॉक्टर रुग्णांना लूटाताना आपण बघत असतो, पण नूरीने रुग्णांचा १० रुपयांत उपचार करुन अनेक डॉक्टरांसाठी आदर्श निर्माण केला आहे. ती उपचारासोबतच कमी पैशात औषधे उपलब्ध करण्याचे कामही ती करत आहे.

नूरीचे वडिल हे एक संस्था चालवतात, ते नेहमीच लोकांची मदत करत असतात, त्यामधूनच प्रेरित होऊन तिने हे क्लिनिक सुरु केले होते. विशेष म्हणजे जेव्हा तिने घरच्यांची हे क्लिनिक सुरु करण्याची परवानगी घेतली होती, तेव्हा तिच्या घरच्यांनी फक्त परवानगीच नाही, तर आनंदही व्यक्त केला होता.

अनेकदा डॉक्टर रुग्णांना गरज नसतानाही वेगवेगळ्या टेस्ट करुन घेण्यास सांगतात, पण नूरी असे कधीच करत नाही. नूरी रुग्णाची परिस्थिती समजून घेते आणि त्यानुसारच रुग्णांना टेस्ट करण्यास सांगते.

१० रुपयांत उपचार होणाऱ्या या क्लिनिकचे महिन्याच्या भाडे २२ हजार रुपये आहे. त्यासोबतच नूरी तिथे काम करणाऱ्या तीन लोकांना पगारही देते. तिने कोरोनाच्या संकटातही १० रुपयांत रुग्णांचे उपचार केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.