वयाची सत्तरी पार केली असतानाही केले नवे संशोधन, ६४० कोरोना रुग्ण रेमडेसिवीरविना केले बरे

0

 

 

राज्यभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातलेले आहे. अशात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रेमडेसिवीर सर्वात महत्वाचे औषध मानले जात आहे. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका डॉक्टरबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी रेमडेसिवीरविना ६४० कोरोना रुग्ण बरे केले आहे.

विंचूदंशांवरील उपचारांबाबत जागतिक नावलौकीक मिळवलेल्या या डॉक्टरांचे नाव हिंमतराव बावस्कर आहे. बावस्कर यांनी वयाची सत्तरी ओलांडली आहे.कोरोनाच्या महामारीत त्यांनी एकही दिवस रुग्णालय बंद ठेवले नाही. महाडमध्ये असलेल्या रुग्णालयात त्यांनी कोरोना रुग्णांवर यशस्वीपणे उपचार केले आहे.

बावस्कर यांनी डिसेंबर महिन्यात अभ्यालासा सुरुवात केली होती. मार्चपर्यंत यावर प्रकाशित झालेली हजारो जर्नल्स त्यांनी वाचून काढली. तेव्हा गोवर आणि रुबेला या विषाणूंमधील ६० टक्के अमोनो ऍसिड कोरोना विषाणूसारखेच आहे, असे लक्षात आले. तेव्हा लस आली नव्हती, त्यामुळे स्वत:च्या बचावासाठी त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने बीसीजी आणि एमएमआर लसी घेऊन कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास सुरुवात केली.

कुटुंबायांनाही मास्कची, सोशल डिस्टन्सिंगची सक्ती केली. डॉ. बावस्करांनी त्यांची पत्नी प्रमोदिनी यांच्यासोबत आतापर्यंत ६५० कोरोना रुग्णांना जीवनदान दिले आहे. तर कोरोना झालेल्यांपैकी फक्त ११ रुग्ण दगावले आहे. ते रुग्ण उशिरा आल्याने उपचारास प्रतिसाद मिळाला नसल्याचे डॉ. बावस्करांनी म्हटले आहे.

डॉ. बावस्करांनी चार उपचार पद्धतींचा अवलंब केला आहे. त्यामध्ये, १) नेब्युलायझरद्वारे मिथिनल ब्लु २) रुग्णाचे मनोबल वाढवणे ३) ऑक्सिजन आणि ४) स्टिरॉइड्स या चाप पद्धतीने ते रुग्णांवर उपचार करत आहे.

विशेष म्हणजे डॉ. बावस्करांनी एकाही रुग्णाच्या उपचारासाठी रेमडेसिवीरचा उपयोग केला नाही आणि नाही पीपीई कीटचा. त्यांनी मास्क, शिल्ड आणि ग्लोव्हज फक्त यांचाच वापर केला होता. त्यांच्या अभ्यासात असे आढळले होते, की बीसीजी आणि एमएमआर लस घेणाऱ्या लहान मुलांना कोरोना होत नाही, त्यामुळे त्यांनी त्या लस स्वत:ला टोचवून घेतल्या आणि रुग्णसेवा सुरु ठेवली.

डॉ. बावस्कर हे गेल्या १३ महिन्यांपासून कोरोना रुग्णांवर अशा पद्धतीने उपचार करत आहे. ही वेळ पैसे कमवण्याची नाही. तर आपल्या ज्ञानाच्या आधारावर वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करण्याची आहे, असे डॉ. बावस्कर यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे उच्च रक्तदाब आणि थायरॉईड सारखी समस्या असातानाही ते रुग्णांना सेवा देत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.