डॉ. गणेश राख: हॉस्पिटलमध्ये एखाद्या आईला मुलगी झाली की पुर्ण हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटणारा आणि मोफत प्रसुती करणारा देवमाणुस

0

आज आम्ही तुम्हाला अशा एका डॉक्टरची कहाणी सांगणार आहोत ज्यांच्या कार्याने अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. त्या डॉक्टरांचे नाव आहे गणेश राख. गणेश राख यांचे वडील रोजंदारीवर काम करणारे होते. एकीकडे कठीण कौटुंबिक परिस्थिती असूनही डॉक्टर बनण्याची त्यांची कहाणी खुपच प्रेरणादायी आणि मनोरंजक आहे.

दुसरीकडे यशस्वी डॉक्टर बनल्यानंतर त्यांनी जे समाजकार्य केले त्यानंतर ते एक आदर्श बनले आहेत. त्यांनी सन 2007 मध्ये पुणे उपनगर हडपसर येथे 25 खाटांचे सामान्य आणि प्रसूती रुग्णालय स्थापन केले. तेथे त्यांना अनेक गोष्टी कळाल्या . त्यांच्या भागात अनेक समस्या होत्या ज्या ऐकून त्यांना आश्चर्य वाटले.

त्या ठिकाणी रुग्णालय उभारण्यामागील त्यांचा हेतू विविध कारणांमुळे उपचार न मिळणाऱ्या रुग्णांना मदत करणे हा होता. आज, त्यांच्या या हॉस्पिटलने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि अशा प्रकारे ते आपल्या कामातून यशाचे आणि समाजकार्याचे नवीन उदाहरण निर्माण करत आहेत.

या भागात हॉस्पिटल सुरू केल्यानंतर, त्यांना आढळले की येथे मुलींची संख्या खूपच कमी आहे आणि कालांतराने त्यांना कळले की यामागील कारण म्हणजे या भागात सर्रास स्त्रीभ्रूण हत्या केली जात होती. हे थांबवण्याच्या दिशेने सकारात्मक पाऊल टाकत त्यांनी ठरवले की जर त्यांच्या रुग्णालयात मुलगी झाली तर तिच्या कुटुंबाकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

आई आणि मुलीचे सर्व उपचार मोफत केले जातील. आतापर्यंत हजारो मोफत प्रसूती या रुग्णालयात सामान्य आणि सिझेरियनद्वारे यशस्वीपणे झाल्या आहेत. खरं तर, कोणत्याही मुलीचा जन्म झाला तर संपूर्ण रुग्णालयात मिठाई वाटून साजरा केला जातो.

डेक्कन हेराल्डला दिलेल्या मुलाखतीत डॉ. राख म्हणतात, स्त्री भ्रूण हत्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर होत आहे कारण इथे प्रचलित असलेले सामाजिक नियम केवळ महिलांविरोधी नाहीत तर ते मुलीविरोधी देखील आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील एक व्यावसायिक म्हणून, आईने मुलीला जन्म दिला हे समजल्यावर आईने ज्या छळाला सामोरे जावे लागते ते मी अनेक वेळा पाहिले आहे.

त्याहूनही अधिक प्रेरणादायी गोष्ट ही आहे की त्यांचे कार्य आता एका प्रकारच्या सामाजिक चळवळीमध्ये बदलले आहे आणि असे सकारात्मक परिणाम त्यांनी स्वप्नातही पाहिले नव्हते. डॉ.राख डीएनएला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, “माझे काम विविध माध्यम संस्थांनी त्यांच्या अहवालांमध्ये ठळकपणे प्रकाशित केले आहे.

त्याचा परिणाम असा झाला की, मला सुमारे 17 किंवा 18 ग्रामपंचायतींचे प्रतिनिधी आणि शेकडो डॉक्टरांचे फोन आले ज्यांनी मला केवळ लैंगिक चाचण्या आणि गर्भपात न करण्याचे वचन दिले नाही, तर त्यांनी त्यांच्या स्तरावर कुटुंबांना प्रोत्साहित करण्याचे वचन दिले.

आजपर्यंत, महाराष्ट्राच्या आतील भागात राहणारे सुमारे 300 डॉक्टर मुली आणि अनेक संस्था तसेच पुरूष डॉक्टरांनी त्यांना साथ दिली आहे. त्यांनी विदेशातही ही मोहिम चालवली आहे. विदेशातही अनेक लोकांनी त्यांना पाठींबा दर्शवला आहे. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्यांनीही त्यांना हिरो मानले आहे आणि अमिताभ बच्चन त्यातील एक नाव आहे. त्यांच्या या कार्याला सलाम. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

 

Leave A Reply

Your email address will not be published.