काय सांगता! टेस्ला लोकांच्या हातात यायच्या आधीच आता रोखता येणार गाड्यांपासून होणारे प्रदूषण

0

 

प्रदूषण म्हटलं तर डोळ्यांसमोर लगेच धूळ धूर घाण पाणी, यासगळ्या गोष्टी लगेच समोर येतात. आज जगभरात प्रदूषण हा चर्चेचा विषय बनला आहे. जगभरात प्रदूषण रोखण्यासाठी वेगवेगळे उपाय शोधले जात आहे.

सध्या सगळेच जण गाड्या वापरत असल्याने त्यांच्यापासून सुद्धा ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे टेस्ला कंपनीने कार इलेक्ट्रॉनिक कार बनवली पण ती भारतातील लोकांच्या वापरात यायला वेळ लागणार आहे.

आता मात्र या गोष्टीवर कोल्हापुरमध्ये राहणाऱ्या तरुणाने एक उपाय शोधला आहे, ज्यामुळे आता वाढत्या गाड्यांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यास याचा फायदा होणार आहे. या तरुणाचे नाव डॉ. बाबासाहेब संपकाळ असे आहे.

प्रत्येक घरात आता विजेचे काही दिवे सौरउर्जेवर प्रकाशित होऊ लागले आहे. त्यामुळे सोलर सेलच्या माध्यमातून तयार होणाऱ्या उर्जेचे विद्युत उर्जेत रुपांतर करुन ती बॅटरीत साठवले जाते.

बॅटरीत ही उर्जा साठवल्यानंतर मर्यादीत कालावधीसाठीच त्याचा वापर केला जाऊ शकतो. आता हिच सौरउर्जा एका सेलमध्ये साठवून ठेवण्यासाठी डॉ. बाबासाहेब संपकाळ यांनी ‘सुपर कपॅसिटर सोलर सेल’ची निर्मीती केली आहे.

आता या सेलचा वापर करुन चारचाकी वाहने, बसेसमुळे होणारे प्रदूषण आता थांबवता येणार आहे, त्यामुळे आता देशभरातल्या वाढत्या प्रदूषणाला आळा बसणार आहे.

डॉ. बाबासाहेब संपकाळ हे मुळचे कर्नाटकमध्यल्या अक्कोळचे आहे. त्यांचे बीएस्सीचे शिक्षण देवचंद महाविद्यालयामध्ये झाले होते. पुढे त्यांनी शिवाजी महाविद्यालयातून एमएस्सीचे शिक्षण पुर्ण केले होते. त्यानंतर त्यांची निवड भारत सरकारच्या सायन्स आणि टेक्नॉलॉजी विभागाकडून नोबेल विजेत्यांची जर्मनीत होणाऱ्या बैठकीत झाली.

त्यानंतर डॉ. बाबासाहेब संपकाळ यांनी तीन वर्षे जर्मनीच्या हनमाईटनर इन्स्टिट्यूटध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्य केले. तेथे विशिष्ट केमिकल प्रक्रिया करुन लवचिक सोलर सेलच्या निर्मितीत योगदान दिले आहे.

सध्या डॉ. बाबासाहेब संपकाळ विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये भौतिकशास्त्राचे प्राध्यापक काम करत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत १३ विद्यार्थ्यांनी पीएच.डीचे शिक्षण पुर्ण केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.