या बहाद्दराची चहा बनवायची स्टाईल पाहून तुम्हीही म्हणाल, कडक!

0

सोशल मिडीयावर काय व्हायरल होईल काही सांगता येत नाही. अशी अनेक प्रकरणे आहेत ज्यामुळे आज अनेक मध्यमर्गीय आणि गरीब लोक सोशल मिडीयावर व्हायल झाले आहेत. यामुळे त्यांना मदतही मिळाली आहे.

पण या तरूणाकडे वेगलाच टॅँलेंट आहे. हा त्याचा हा टॅंलेंट सोशल मिडियावर सध्या एका चहा विक्रेत्याने धुमाकूळ माजवला आहे. त्याची चहा बनवायची कला आणि लोकांना चहा देण्याची पद्धत लोकांनी आकर्षित करत आहे.

त्याच्या स्टॉलवर तुम्हाला फक्त चवदार चहाच नाही मिळत पण त्यासोबत तुमचे स्वागतही जबरदस्त पद्धतीने केले जाते. तुम्ही त्याच्या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की तो कशा पद्धतीने चहा बनवतो.

त्याची ही चहा बनवण्याची पद्धत सध्या पुर्ण सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. त्याने दावा केला आहे की त्याने ही कला सुपरस्टार रजनीकांतच्या प्रेरणेतुन मिळाली आहे. डॉलीच्या टपरीवर तुमचे स्वागतही जंगी केले जाईल.

सध्या डॉली सोशल मिडीयावर स्टार बनला आहे. त्याची केसांची स्टाईल, कपडे घालण्याची पद्धत आणि चहा बनविताना दुध टाकण्याची पद्धत यामुळे तो खुप प्रसिद्ध झाला आहे. तुम्ही त्याला व्हिडीओमध्ये पाहू शकता की तो कशाप्रकार पातेल्यात दुध उंचावरून टाकतो.

या प्रक्रियेत दुधाचा एक थेंबही खाली पडत नाही. चहा तयार झाल्यानंतर डॉली चहासुद्धा ग्लासात उंचावरून टाकतो. पण तेव्हासुद्धा चहाचा एक थेंबही खाली सांडत नाही. त्याची स्टाईलच वेगळी आहे त्यामुळे लोक त्याच्या स्टॉलवरून जातच नाहीत.

तरूणांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेला डॉली चहा स्टॉल गेल्या २० वर्षांपासून लोकांना चहाची सुविधा देत आहे. आपल्या खुशदिल पद्धतीमुळे त्याचे आजच्या काळात अनेक चाहते बनले आहेत. फक्त चहा बनविण्याची नाही तर त्याची सिगरेट ओढण्याची स्टाईलही खुप लोकप्रिय आहे.

डॉली आपले दुकान सकाळी सहा वाजता उघडतो आणि रात्री ९ वाजता त्याचे दुकान बंद होते. तुम्ही फक्त ७ रूपयांत गरम चहा पिण्याचा आनंद डॉलीच्या स्टॉलवर घेऊ शकता. तुम्हाला माहिती आवडली असेल तर पुढे पाठवा.
https://fb.watch/3MCOjENTq6/

Leave A Reply

Your email address will not be published.