पुण्यातील या डॉक्टरला लोक म्हणतात देवदूत, यामागील कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल

0

तुम्ही अनेक डॉक्टर बघितले असतील जे रूग्णांना लुटतात. वाढीव बील देतात. अनेक लोकांच्या तक्रारी तुम्ही पाहिल्या असतील. पण काही डॉक्टर असेही असतात जे रूग्णांसाठी वरदानच ठरतात. आज आम्ही तुम्हाला अशा एका डॉक्टरांबद्दल सांगणार आहोत जे गरीबांवर मोफत उपचार करतात.

महाराष्ट्रातील पुणे येथे राहणारे डॉक्टर अभिजीत सोनावणे गरीबांवर उपचार करण्यासाठी खुप प्रसिद्ध आहेत. अभिजीत सोनावणे फक्त मोफतमध्ये उपचारच नाही करत तर ते गरीबांना मोफत औषधेही देतात.

आणि ते महिन्याला किंवा आठवड्याला नाही तर रोज हेच काम करत असतात. ते रोज औषधांचा बॉक्स घेऊन अशा भिकाऱ्यांच्या शोधात घराच्या बाहेर निघतात आणि त्यांच्यावर मोफत उपचार करतात.

त्यांचे म्हणणे आहे की, मी अशा बऱ्याच लोकांना भेटलो आहे ज्यांना त्यांच्या घरच्यांनी सोडून दिले आहे आणि आता ते भिक मागत आहेत. त्यामध्ये वृद्ध लोकांचाही समावेश आहे. त्यांच्याकडे भीक मागण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो.

मी माझ्यासोबत आवश्यक औषधे बरोबर घेऊन चलतो. त्यांच्यावर मी उपचार करतो आणि त्यांना मोफत औषधे पुरवतो. रविवार सोडला तर ते रोज सकाळी १० ते ३ वाजेपर्यंत हे काम करतात. डॉक्टर सोनावणे म्हणाले की, त्यांना समाजासाठी चांगले काम करायचे होते.

पण याच्यामागे त्यांचा खुप मोठा उद्देश आहे. गरीब लोकांवर उपचार करता करता ते त्यांच्याशी संवाद साधतात. आता त्यांचे त्या गरीब लोकांसोबत एक वेगळेच नाते जोडले गेले आहे. त्यानंतर सोनावणे त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतात की, भीक मागणे सोडून देऊन एखादे छोटे मोठे काम सुरू करा.

त्यांनी त्यांना आश्वासनही दिले आहे की त्यांना कामधंदा सुरू करण्यासाठी लागेल ती मदत करायला तयार आहे. आजच्या काळात असे डॉक्टर भेटणे खुपच कठीण आहे. पुण्यातील अनेक भिकाऱ्यांवर त्यांनी उपचार केले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.