मैत्रीणीच्या मृत्युमुळे बसला जबर झटका, तिच्या आठवणीत उभा केला लाखोंचा व्यवसाय

0

 

 

आयुष्यात कोणती घटना पुर्ण आयुष्य बदलून टाकेल हे सांगता, येत नाही मग ती घटना कोणतीही असो दु:खाची वा सुखाची. आजची गोष्ट ही दिव्या राजपूत नावाच्या महिलेची. दिव्याचा ऑर्गेनिक प्रॉडक्ट्सचे स्टार्टअप आहे, पण ते सुरु होण्यामागेही एक गोष्ट आहे.

दिव्याने स्टार्टअप आपल्या चार मैत्रिणींसोबत सुरु केला होता. आता त्यांच्या या व्यवसायात २५ पेक्षा जास्त महिल्या जोडल्या गेलेल्या आहे. दिव्याने तीन महिन्यांपुर्वीच या व्यवसायाला सुरुवात केली होती. आता तिला दिवसाला २०० ऑर्डर्स मिळत असून या व्यवसायातून दिव्या लाखोंची कमाई करत आहे.

दिव्याची एक मैत्रीण होती तिचे नाव होते काकुल रिजवी असे होते. काकुल मार्केटिंग प्रोफेशन होती, पण तिला कॅन्सर होता. दिव्याने आणि काकुल यांनी एक स्टार्टअप सुरु केला होता. पण एकेदिवशी अचानक काकुलचा मृत्यु झाला. काकूलच्या मृत्युचा दिव्याला जबर धक्का बसला आणि तिने काकूलसोबत सुरु केलेला स्टार्टअप वाढवण्याचा निर्णय घेतला.

तिने ऑर्गेनिक प्रॉडक्ट्स बनवण्यास सुरुवात केली, तसेच हे प्रॉडक्ट्स ती लोकांना परवडेल अशा किंमतीत विकते. खरंतर ती काकुलच्या मृत्युनंतर दिव्या व्यवसायात एकटी पडली होती, त्यामुळे तिला असे वाटत होते, कि हा व्यवसाय तिला चालवता येईल कि नाही पण लवकच तिला चार मैत्रीण मिळाल्या आणि तिने पुन्हा हा व्यवसाय उंचीवर नेला.

दिव्याने हा व्यवसाय सुरु करण्यासाठी आसाम, मेघालय यांसारख्या राज्यातील स्थानिक मजुरांशी आणि शेतकऱ्यांशी टायअप केले आहे. ती ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांना ऑर्डर करते, तसेच ज्या राज्यातुन तिला चांगले प्रॉडक्ट मिळते ती त्याच राज्यातुन प्रॉडक्ट मागवते.

दिव्याने आपली स्वता:ची वेबसाईट लाँच केली आहे. तसेच तिने सबस्क्रिप्शन कॅम्पेन सुद्धा लाँच केले आहे. म्हणजेच या साईटवर जेव्हा पण एखादे नवीन प्रॉडक्ट लाँच झाले कि लगेच ग्राहकांना त्यांचे नोटीफिकेश जाते.

दिव्या १०० वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स तयार करते. त्यामध्ये बुट, कॅनवास बॅग, हर्बल इम्युनिटी बुस्टर, हँडमेड क्राफ्ट, ब्युटी प्रॉडक्ट्स बनवते. त्यातून ती महिन्याला लाखो रुपये कमवत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.