शिवा असा गोतखोर ज्याने आतापर्यंत वाचवले आहे तब्बल ११४ लोकांचे जीव

0

 

आयुष्यात वळणावर अनेक ठिकाणी वाईट प्रसंग येत असतात, अशात त्या परिस्थितीत काही पर्याय नाहीये असे म्हणत काही लोक आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात, पण आत्महत्या करणे हे नक्कीच आपले परिस्थितीतुन मार्ग काढण्याचा पर्याय नाहीये.

गेल्या काही वर्षांपासून तर आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. अशात हैद्राबादच्या एका माणसाने आतापर्यंत ११४ लोकांचा जीव वाचवला आहे, लोकांचा जीव वाचवणे त्याचे आता कामच बनले आहे.

हैद्राबादच्या हुसेनसागर इथल्या तलावात अनेक लोक आपल्या आयुष्याच्या लढाईतून हारून इथे जीव देण्यासाठी येतात, मात्र शिवा त्यांना वाचवून घेतो, त्याला वाचवता आले नाही तर तो त्यांचे मृतदेह काढून देतो.

कोरोना काळात अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. तसेच लोकांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत होते, तेव्हा आत्महत्या करण्यासाठी आलेल्या १७ लोकांचा जीव शिवाने वाचवला आहे.

शिवाने ही समाजसेवा सुरू करण्याआधी तो हात मजूर होता. मिळेल तिथे काम करून आपले पोट भारत होता. त्याचे लहानपण हे रेल्वे रुळावरच गेले आहे. एकदा तिथे एक मृतदेह पडलेला होता. तेव्हा काही लोकांना ते मृतदेह बाजूला करायचे होते, मात्र तिथे कोणीही मदतीसाठी येत नव्हते, तेव्हा तिथे शिवाने त्या लोकांना मदत केली, तेव्हा त्या मदतीचे शिवाला ३० रुपये मिळाले होते.

तेव्हा पासूनच शिवाने समाजसेवेचे हे काम सुरू केले आहे. आतापर्यंत त्याने जवळपास ११४ लोकांचा जीव वाचवला आहे. जेव्हा शिवाला कोणाला तरी वाचवायचे असेल, तेव्हा तो स्वतःच्या जीवाची पर्वा न करता थेट पाण्यात उडी घेतो. शिवा गेल्या २० वर्षांपासून हे काम करत आहे.

शिवा अनेकदा लोकांना वाचवता वाचवता स्वतः जखमी होऊन जातो. २०१४ आणि २०१६ मध्ये तर तो लोकांना वाचवता वाचवता गंभीर जखमी झाला होता, २०१४ मध्ये त्याच्या खांद्यात रॉड गेली होती, त्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता.

शिवाच्या या कामामुळे तेलंगणा पोलिसांनी त्याच्या मुलांच्या शिक्षणाची जवाबदारी घेतली आहे. तो अनेकदा त्या तलावात मृतदेह काढण्यासाठीही उतरतो. त्यामुळे पोलिसांना त्याची मोठी मदत होते.

मी हे काम लोकांचा आशीर्वाद मिळावा यासाठी करतो. माझे स्वप्न आर्मीत जाण्याचे होते, मात्र परिस्थितीमुळे मला आर्मीत जाता आले नाही, मात्र माझ्या एका मुलाला तरी मी आर्मीत पाठवेल, असे शिवा म्हणतो.

Leave A Reply

Your email address will not be published.