गुजरातला फिरायला गेली आणि सुचली ‘ही’ धडाकेबाज आयडिया आता करतेय लाखोंची कमाई

0

 

 

अनेकदा आपण अशा लोकांच्या गोष्टी ऐकतो जे हातातली नोकरी सोडून व्यवसाय सुरु करतात. त्या व्यवसायातून लोक लाखो करोडोंची कमाई करत असतात. पण तुम्ही यांच्यामध्ये एस साम्य पाहिले असेल म्हणजे त्यांच्या व्यवसाय करण्याची कल्पना दुसऱ्यांपेक्षा खुपच वेगळी असते.

ज्या व्यक्तीने पण एक वेगळ्या कल्पनेने व्यवसाय सुरु केला आहे, अनेकदा त्याचा फायदाच झाला आहे. म्हणजेच जितक्या भन्नाट तुमच्या कल्पना असती तितकाच व्वसायात तुमचा फायदा होतो. आजची ही गोष्ट पण अशाच एका तरुणीची आहे.

ही तरुणी एकदा ट्रिपला फिरायला गेली असताना तिला एक व्यवसाय करण्याची कल्पना सुचली. ती कल्पना इतकी भन्नाट होती की आता तिच्या या कंपनीचा वार्षिक उलाढाल कोट्यवधींमध्ये पोहचली आहे.

या तरुणीचे नाव दिशा सिंग असे आहे. तिने अहमदाबाद येथून आयआयएमचे शिक्षण घेतले आहे. जेव्हा ती सेकंड इयरमध्ये होती तेव्हा ती कच्छला फिरायला गेली होती. तेव्हा तिला तिथल्या लोकल हँडीक्राफ्ट एक्सप्लोअर करताना एक आयडीया आली.

त्यावेळी तिला वाटले कि ते डिझाईन तिच्या मैत्रिणींना आवडतील, पण तरीही तिने खरेदी केलेल नाही कारण त्या हँडीक्राफ्टमध्ये काही गोष्टींची कमी होती. तिला एका व्यवसायाही कल्पना सुचली.

२०१६ मध्ये तिने, बॅग, पर्स, तसेच वेगवेगळ्या गोष्टींना या क्राफ्ट आधुनिक बदल करण्याचा विचार केला. म्हणजेच गुजरातमध्ये मिळत असलेल्या गोष्टींवर नवनवीन प्रकारच्या डिझाइन करून त्या विकण्यास सुरुवात केली. तसेच तिने खादीच्या बॅग बनवण्यास सुरुवात केली.

आता ती विविध प्रकारच्या बॅग तयार करते. त्यात हँडबॅग, लॅपटॉप बॅग, मेसेंजर बॅग, पर्स, पाकिटे यासर्व गोष्टींवर ती डिझाइन तयार करते आणि त्या गोष्टी विकते. तिने सुरुवातीला हा व्यवसाय करण्यासाठी २० हजार रुपये गुंतवले होते, आज याच कंपनीची वार्षिक उलाढाल ५ कोटींच्यावर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.