अमेरिकेतून थेट आला गावी अन् सुरू केली बांबूची शेती, आता महिन्याला कमवतोय लाखो रुपये

0

आज तरुण तरुणी नोकरीपेक्षा शेती करण्याला प्राधान्य देत आहे. अनेकांना नोकरी भेटत नसल्यामुळे ते शेतीत वेगवेगळे प्रयोग करून बक्कळ कमाई करत आहे, पण आज आम्ही तुम्हाला अशा एका माणसाची गोष्ट सांगणार आहोत, ज्याने शेतीसाठी आपली अमेरिकेची नोकरी सोडली आहे.

मध्य प्रदेशच्या खरगोन जिल्ह्यात राहणाऱ्या या शेतकऱ्याचे नाव दीपक गोयल असे आहे. अमेरिकेतून इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरची नोकरी सोडून ते आपल्या पत्नीसोबत बांबूची शेती करत आहे. विशेष म्हणजे ज्या जमिनीवर शेती करणे जवळपास अशक्य आहे त्या जागेवर सुद्धा त्यांनी शेती करून दाखवली आहे.

गोयल दाम्पत्य दहावर्षांपूर्वी अमेरिका सोडून गावात परतले होते.  गावी आल्यानंतर दीपक यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. दीपक यांनी शेती करताना खडकाळ जमिनीवर बांबूची शेती करून तिला हिरवीगार जमीन बनवली आहे.

दीपक हे शेती करून फक्त कमाईच करत नाहीये, तर त्यांनी दुसऱ्या लोकांना आणि महिलांना रोजगार सुद्धा दिला आहे. त्यांनी ३० कुटुंबांना जोडण्यासोबतच त्यांनी ७० महिलांना रोजगार दिला आहे.

गोयल दाम्पत्याने १५० एकर जमिनीत ही बांबूची शेती केली आहे. बांबूच्या शेतीसोबतच त्यांनी आले, अश्वगंधा, पामरोसाची, लागवड केली आहे, या शेतीतून ते महिन्याला लाखो रुपयांची कमाई करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.