काय सांगता! या मराठमोळ्या माणसाने २००३ मध्येच तयार केली होती इलेक्ट्रिक रिक्षा

0

 

दिवसेंदिवस पेट्रोलचे भाव वाढत आहे, तसेच इंधनांमुळे गाडीतून निघणाऱ्या धुरामुळे पर्यावरणाचेही नुकसान होत आहे, त्यामुळे सगळ्यांचे लक्ष आता इलेक्ट्रीक गाड्यांकडे आहे. अशात काही ठिकाणी सोलारवर चालणाऱ्या गाड्यांचाही उपयोग केला जात आहे.

आज आम्ही तुम्हाला अशा मराठमोळ्या माणसाची गोष्ट सांगणार आहोत, ज्या माणसाने आपल्या साध्या ओमनी गाडीलाच सोलार व्हॅनमध्ये तयार केले आहे. नागपुरमध्ये राहणाऱ्या माणसाचे नाव दिलीप चित्रे असे आहे.

६६ वर्षे वय असणाऱ्या या माणसाने २०१८ मध्ये सौर उर्जेवर चालणारी गाडी तयार केली आहे. आतापर्यंत त्यांनी या व्हॅनमधून ४५०० किलोमीटरचा प्रवास केलेला आहे.

१९९५ मध्ये चित्रे यांनी सौग उर्जेच्या फायद्यांबद्दल वाचले होते, तेव्हापासून त्यांची सोलर वाहनांबद्दलची उत्सुकता वाढत गेली आणि त्यांनी या कामात संशोधन सुरु केले.

२००३ मध्ये त्यांनी पहिला प्रयोग रिक्षावर केला होता, त्यांनी एका रिक्षाला बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षामध्ये कन्वर्ट केले होते. त्यांनी त्या प्रॉजेक्टबद्दल अनेक संस्थांना कळवले पण सर्वांनीच त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांनी हा प्रॉजेक्ट बंद केला.

२०१७ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा प्रयोग केला. त्यांनी पाच लाख रुपयांमध्ये एक जुनी ओमनी व्हॅन खरेदी केली. त्याचे इंजिन बदलून त्यांनी या व्हॅनला सौर उर्जेवर चालणारी व्हॅनमध्ये बदलले.

आज ते या व्हॅनचा वापर शाळाच्या व्हॅनसाठी करतात. तसेच ते दिवसाला २५ किलोमीटर ही व्हॅन चालवतात. ही व्हॅन बनवण्यासाठी त्यांनी या व्हॅनमध्ये ४८ व्होल्टची बॅटरी आणि डीसी मोटार लावली आहे. तसेच व्हॅनवर ४०० व्हॅटचा सोलार पॅनल बसवलेला आहे. त्याच्या साहाय्याने बॅटरीला उर्जा मिळते.

Leave A Reply

Your email address will not be published.