“माझ्याकडे एक सोन्याची आणि एक चांदीची चप्पल, ज्याची जशी लायकी तशी मी वापरतो”

0

 

तो दिवसा होता ऑक्टोबर १९८५ चा. त्यावेळी धीरूभाई अंबानी आणि बॉम्बे डाईंगचे नसली वाडिया यांचा व्यवसायिक संघर्ष वाढत चालला होता. तेव्हा इंग्रजी वृत्तपत्र फायनेन्शियल एक्सप्रेस आणि पीटीआय दोघांनी बॉम्बे डाईंग हाऊस विरोधात एक बातमी दिली होती.

त्यावेळी रामनाथ गोयंका पीटीआयचे चेअरमन होते. इतके असून पण त्यांना हे लक्षात येत नव्हते की बॉम्बे डाईंग विरोधात ज्या बातम्या येत होत्या त्याचे सूत्रधार कोण होते.

३१ ऑक्टोबरला पुन्हा एक बातमी बॉम्बे डाईंगविरोधात छापण्यात आली. त्यावेळी रिलायन्सच्या पब्लिक रिलेशन ऑफिसर कीर्ती अंबानी यांनी दिलेले प्रसिद्धी पत्रक थेट छापण्यात आले होते.

रामनाथ गोयंका यांनी बातम्यांच्या बाबत माहिती घेतली त्यावेळी त्यांना असे लक्षात आले की, पीटीआयचे वृत्तसंपादक धीरुभाईंनी मॅनेज केले आहे.

तेव्हा रिलायन्स पीटीएच्या (Purified Terephthalic Acid) मार्गाने चालला होता. त्यावेळी अशी चर्चा होती की, पीटीएच्या गैरव्यवहारात रिलायन्स इंडस्ट्रीची चौकशी सुरु आहे. तेव्हा धीरुभाईंनी पुन्हा पीटीआयच्या वृत्तसंपादकाला पटवून एक बातमी मॅनेज करायला सांगितली.

ही गोष्ट रामनाथ गोयंका यांना कळताच त्यांनी वृत्तसंपादकाला बोलावून घेतले. त्यावेळी गोयंका यांनी बातमीची शहानिशा केली का याबाबत विचारणा केली. वृत्तसंपादकाने बातमी तपासलेली नव्हती. त्यामुळे बातमी चुकीची असून त्याबाबत क्षमा असावी असे वृत्त पीटीआयने दुसऱ्या दिवशी दिले.

रामनाथ गोयंका खुप संतापलेले होते, त्यांनी धीरुभाई अंबानी यांची भेट घेण्याचे ठरवले आणि ते अंबानी यांच्या भेटीला गेले. त्यावेळी अंबानी एकच उत्तर दिले, मी एक बिझनेसमॅन आहे. मी माझ्याकडे दोन प्रकारच्या चप्पला ठेवतो, एक सोन्याची आणि एक चांदीची ज्याची जशी लायकी तशी मी चप्पल वापरतो.

त्यांनी गोयंका यांना अप्रत्यक्षपणे असे सांगितले होते की, तुमची पण एक किंमत आहे. त्या किंमती पलीकडे त्यांचे काही महत्व नाही. पण धीरुभाई अंबानी यांनी गोयंका यांच्यासोबत बोललेले हे वाक्य त्यांना चांगलेच महागात पडले.

रागात रामनाथ गोयंका यांनी रियायन्सला पुर्ण एक्सपोज केले. त्यामुळे अंबानींचे खुप नुकसान देखील झाले. पण अंबानी यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडे सोन्याची आणि चांदीच्या दोन्ही चप्पला होत्या. त्यामुळे त्यांचा व्यवसायात पुन्हा वाढीस आला.

Leave A Reply

Your email address will not be published.