मराठमोळ्या धनश्रीची गगनभरारी! एकवेळचे जेवण करून, गाडीत राहून धनश्री बनली पायलट

0

 

 

अनेकदा आपण ध्येय कसे गाठता येईल याचा विचार करण्यापेक्षा आपली परिस्थिती चांगली नाही, याचे कारण आपण देत बसत असतो. अशात जर तुम्ही ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न केले, तर परिस्थिती कशीही असो, तुम्हाला तुमचे ध्येय एक दिवस नक्की गाठता येईल. असेच एक उदाहरण आता समोर आले आहे.

एकेकाळी खुप गरिबीची परिस्थिती असणारी मुलगी आज पायलट आहे. तिने आपल्या जिद्दीवर आपले पायलट होण्याचे स्वप्न पुर्ण केले आहे. या मुलीचे नाव धनश्री भोसले असे आहे.

धनश्रीचा जन्म नाशिकमध्ये झाला होता. त्यानंतर तिच्या वडिलांची पोस्टींग नागपुरमध्ये झाली. त्यामुळे तिने तिचे बारावीचे शिक्षण नागपुरमध्येच केले. धनश्रीला लहानपणापासूनच पायलटच्या युनिफोर्मची आवड होती. त्यामुळे तिने पायलट होण्याचा निर्णय घेतला.

धनश्रीने पायलट होण्याबद्दल आपल्या वडिलांना सांगितले. वडिलांनी तिला पुर्ण पाठिंबा दिला. पण तिचे शिक्षण पुर्ण करण्यासाठी तेव्हा त्यांच्याकडे तेवढे पैसे नव्हते. आपल्या मुलीसाठी त्यांनी कुठलाही विचार न करता घर विकून तिला परदेशी पाठवले.

अमेरिकेला शिक्षणासाठी गेलेल्या धनश्रीला पैशांची अडचण भासत होती, तिला राहायलाही घर नव्हते. तिथे असताना तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ती तिथे बऱ्याचदा एकवेळचे जेवण करायची. राहायला घर नसल्यामुळे ती एका गाडीतच झोपायची.

कॉलेजमध्येही मी एकटीच मुलगी होती, त्यामुळे मला माझ्या राहणीमानावरुनही टोमणे मारले जायचे, वाईट बोलले जायचे, असे धनश्रीने एका मुलाखतीत म्हटले आहे.

एक वेळ अशीही आली होती की, मला वाटले आता सगळे सोडून भारतात यावे पण मी पुन्हा एकदा विचार केला आणि पायलट बनण्याचा आपला निर्णय कायम ठेवला. मी बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली.

लोकांकडे दुर्लक्ष केल्याने मला संकटांवर मात करता आली आणि शेवटी मी पायलट बनुन भारतात आली, मला लगेच एअर इंडियामध्ये नोकरीही मिळाली, असे धनश्रीने म्हटले आहे.

धनश्री गेल्या चार वर्षांपासून एअर इंडीयामध्ये नोकरी करत आहे. परिस्थिती कशीही असो आपल्यात जर आपले ध्येय गाठण्याची हिम्मत असेल तर एक दिवस आपण नक्की ते पुर्ण करु शकतो, याचे उत्तम उदाहरण धनश्री भोसले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.