देविता सराफ: ४० पेक्षा कमी वयात १२०० कोटी कमावणारी देशातली सगळ्यात श्रीमंत महिला

0

हुरून इंडिया २०२० ची श्रीमंतांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. या लिस्टमध्ये द व्हीयु ग्रुपची चेअरमन आणि सीईओ देवी सराफ यांचे नाव आहे. अवघ्या ३९ व्या वयात देशातील सर्वांत श्रीमंत महिला म्हणून त्यांची ओळख आहे. देवी सराफ यांची संपत्ती जवळपास १२०० कोटीं इतकी आहे.

देविता सराफ यांनी हार्वर्ड युनिव्हर्सिटीतून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. देविता जेनिथ कॉम्प्युटरचे मालक राजकुमार सराफ यांची मुलगी आहे. देविताला पाहिल्यापासूनच काही वेगळे करायचे होते.

देविताला स्वतःला काहीतरी वेगळे करायचे असल्याने देविता यांनी आपल्या वडिलांच्या व्यवसायात जाण्याचे टाळले. देविता यांना माहीत होते की, पुढे टेक्नॉलॉजीची जगात मागणी वाढणार आहे, त्यामुळे देविता सराफ यांनी २००६ मध्ये व्हीयु टीव्हीची सुरुवात केली.

देविता यांची कंपनी लेटेस्ट टेक्नॉलॉजीची टीव्ही बनवते. या कंपनीचे टीव्ही ऍडव्हान्स असल्याने यात युट्युब आणि हॉटस्टार सारखे एप्लिकेशन देखील चालतात. त्यामुळे या टीव्हीला बाजारात मोठी मागणी मिळाली आहे.

देविता यांनी जेव्हा व्हीयु कंपनी सुरू केली तेव्हा त्यांचे वय फक्त २४ होते. सुरुवातीला देविता यांना या व्यवसायात अनेक अडचणी आल्या, मात्र त्यानंतर २०१२ मध्ये त्यांच्या कंपनीला चांगला प्रॉफिट मिळायला लागला.

२०१७ मध्ये या कंपनीचा टर्न ओव्हर जवळपास ५४० कोटी इतका पोहचला. आज देविता यांच्याकडे भारतातले १० लाखांपेक्षा जास्त ग्राहक आहे. तसेच कंपनी जगभरातल्या ६० देशांमध्ये या टीव्हीची विक्री करते.

देविताला यश मिळवणे सोपे नव्हते, तिला सुरुवातीला अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. जेव्हा ती एखाद्या मीटिंगमध्ये डील करण्यासाठी जात होती तेव्हा अनेक लोक तिला सिरियसली घेत नव्हते, अनेकदा मुलगी म्हणून लोक तिच्याकडे दुर्लक्ष करायचे.

जेव्हा तुम्हाला यश मिळवायचे असेल तेव्हा तुम्ही लोकांकडे लक्ष दिले नाही पाहिजे. तुम्ही तुमचे काम पूर्ण विश्वासाने करणे गरजेचे आहे. तेव्हाच तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल असे, देविता म्हणतात.

देविता तरुणींना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित देखील करत आहे. महिलांना फक्त त्यांच्या सुंदरतेने नाही तर त्यांच्या कौशल्याने देखील ओळखले पाहिजे, असेही देविता म्हणतात.

देविता सराफ यांना ६५ कोटी कमवण्यासाठी जवळपास आठ वर्षे लागले होते. मात्र आपल्या जिद्दीच्या,मेहनतीच्या आणि विश्वासाच्या जोरावर पुढच्या चार वर्षात १००० कोटींपेक्षा पैसे कमावले आहे. त्यामुळे देविता सराफ देशातील ४० वर्षांपेक्षा कमी वयातील सगळ्यात श्रीमंत महिला बनली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.