नादच खुळा! सकाळी-सकाळी सायकलवर फिरून ‘हा’ उपमहापौर जागेवरच सोडवतो सर्व समस्या

0

आपण नेहमीच नेत्यांना त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यात जाताना बघत असतो. पण आजची ही गोष्ट एका अशा उपमहापौराची आहे जो रोज आपल्या वार्डातल्या समस्या जाणून घेण्यासाठी सायकलवर फेरफटका मारतो.

रोज सकाळी ७ वाजता कोल्हापूर महानगर पालिकेचे काँग्रेसचे उपमहापौर संजय मोहिते आपल्या घरून बाहेर पडत असतात. तसेच ते फक्त आपल्या आरोग्यासाठी नाही तर ते स्थानिक नागरिकांना भेटतात आणि त्यांच्या समस्या जाणून घेतात.

लोकांशी संपर्क साधण्याची ही कल्पना त्यांना महात्मा गांधी यांच्या जनसेवाने मिळाली होती. ते दिवसभरात वेगवेगळ्या लोकांशी भेट घेत असतात. त्यामुळे पूर्ण वार्डात त्यांना एक वेगळी ओळख मिळाली आहे. त्यांना ‘सायकल सुधारक’ म्हणून पण ओळखले जाते.

महाराष्ट्र सरकारचा सर्वात प्रतिष्ठित असणारा ‘संत गाडगे महाराज स्वच्छता अभियान’ पुरस्कार मोहिते यांनी गेल्या १० वर्षात सहा वेळा मिळवला आहे.

त्यांनी आपल्या वार्डात खूप सुधारणा केल्या आहेत, त्यात रस्त्यात सुधारणा, ड्रेनेज नेटवर्कमध्ये बदल, वार्डातील लोकांसाठी जिम, उद्याने तसेच पायी चालण्यासाठी फूटपाथ देखील बनवले आहे.

आधी मोहिते आपली स्कूटर घेऊन शहरात फिरायचे, पण नंतर त्यांनी सायकलवरच फिरायचे ठरवले. सायकलीमुळे आरोग्यही सुधारते आणि माणूस नेहमीच सक्रिय असतो, असे संजय मोहिते यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.