८० किलोचा भाला, ७२ किलोचे कवच घेऊन लढणाऱ्या महाराणा प्रताप यांचा मृत्यु कसा झाला?

0

मेवाडचे राजा महाराणा प्रताप आजही एक वीर योद्धा आणि भारतासह जगातील पराक्रमाचे प्रतीक म्हणून ओळखले जातात. असे म्हटले जाते की युद्धाच्या वेळी, महाराणा प्रताप यांनी शत्रूंचा सामना करताना २०८ किलो शस्त्रास्त्रे घेऊन हल्ला करायचे. तलवारीच्या एका झटक्यात त्यांनी घोड्याचे दोन भाग केले होते.

दरम्यान, महाराणा प्रताप यांची जयंती तारीख आणि पुण्यतिथी संदर्भात भिन्न मते आहेत. एकदा एकाच वेळी दोन शक्तिशाली सम्राट समोरासमोर आले होते. एक सम्राट भारतावर राज्य करणार होता तर दुसर्‍यास त्याचे राज्य वाचवायचे होते. ते दोन सम्राट होते सम्राट अकबर आणि राजपूत वीर योद्धा महाराणा प्रताप.

मुघल सम्राट अकबर आणि महाराणा प्रताप यांच्यात नेहमीच राजेशाही आणि स्वाभिमानाची लढाई होती. या दोघांमधील हल्दीघाटीच्या युद्धाला महाभारतानंतरचे दुसरे सर्वात विनाशकारी युद्ध म्हटले जाते. प्रचलित कथा व माध्यमांच्या वृत्तानुसार, मुघल बादशाह अकबरने मेवाडचे राजे महाराणा प्रताप यांना मुघलांच्या अधीन राहण्याची ताकीद दिली.

महाराणा प्रताप यांनी हा हुकूम आपल्या आणि राजपुतांच्या स्वाभिमानाचा अपमान असल्याचे सांगितले आणि ते नाकारले. यानंतर १५७६ मध्ये दोन्ही बाजूंनी सैन्य उदयपुर जवळील हल्दीघाटी मैदानावर आले. काही इतिहासकारांचे म्हणणे आहे की, युद्ध टाळण्यासाठी व अधीनता स्वीकारण्यासाठी अकबरने आपले राजदूत ६ वेळा महाराणा प्रतापकडे पाठवले आणि मेवाड मोगलांच्या ताब्यात देण्याची ऑफर दिली पण महाराणा प्रताप यांनी ते मान्य करण्यास नकार दिला.

असे म्हटले जाते की महाराणा प्रताप  हे युद्धात कौशल्यवान होते आणि ते मैदानात येताच विरोधी सैनिक थरथर कापायचे. युद्धामध्ये त्यांनी आपला आवडता घोडा चेतक आणला होता. लोकप्रिय कथांनुसार, महाराणा प्रताप इतके शक्तिशाली आणि सामर्थ्यवान होते की त्यांनी युद्धाच्या वेळी छातीवर लोखंडी, पितळ आणि तांबेने बनविलेले ७२ किलोचे चिलखत घातले होते.

याशिवाय ते ८१ किलोचा भाला घेऊन जात असत. त्यांच्या कमरेवर दोन तलवारीही बांधल्या जायच्या. अशाप्रकारे, युद्धाच्या वेळी ते एकूण २०८ किलो वजनाने लढायचे. असे म्हटले जाते की ते त्यांच्या एका वाराने घोड्याचे दोन तुकडे करीत असे. महाराणा प्रताप यांचा जन्म ९ मे १५४० रोजी राजस्थानच्या मेवाड राजघराण्यात झाला.

ते मेवाडच्या राजा उदयसिंगांचे सर्वात मोठे पुत्र होते. पण उदयसिंग यांचे त्यांचा नववा मुलगा जगमाल सिंग याच्यावर खुप प्रेम होते. मृत्युनंतर त्यांनी जगमालला राजा बनवले. पण महाराणा प्रताप हे सर्वात मोठे होते त्यामुळे सर्व मंत्र्यांनी आणि दरबाऱ्यांनी महाराणा प्रताप यांनाचा राजा मानले. त्यामुळे महाराणा प्रताप हे राजा बनले.

अकबरसमोर कधीही न झुकणारे महाराणा प्रताप तेव्हा हारले जेव्हा त्यांच्याच मुलाने त्यांचा विश्वासघात केला. आपल्या मुलामुळे महाराणा प्रताप युद्ध हारले आणि अखेर मेवाड अकबरच्या ताब्यात गेले. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. आणि जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.