लेडी सिंघम! १४ व्या वर्षी केले लग्न १८ व्या वर्षी बनली आई अन् अशी झाली आयपीएस

0

माणसात जर आपले ध्येय गाठण्याची जिद्द असेल तर त्याच्या समोर कितीही संकट आली तरी त्यांचा सामना तो करु शकतो. आज आम्ही तुम्हाला अशा एका महिलेची गोष्ट सांगणार आहोत, जिने आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाचा सामना केला आणि आपले ध्येय गाठले.

मूळ गाव तामिळनाडू असणाऱ्या या महिलेचे नाव एन अंबिका असे आहे. त्या सध्या डीसीपी आहे. अंबिका या सध्या मुंबईत कार्यरत असून मुंबईत त्यांना लेडी सिंघम म्हणून ओळखले जाते. पण त्यांचा आयपीएस होण्यापर्यंतचा प्रवास अत्यंत खडतर होता.

अंबिका यांचे लग्न वयाच्या १४ व्या वर्षीच झाले होते, तसेच वयाच्या १८ व्या वर्षी अंबिका आई बनल्या होत्या. त्यांचे पती पोलिस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते.

एकदा त्या आपल्या पतीसोबत प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रम पाहण्यासाठी गेल्या होत्या. तिथे त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना मिळणारा सन्मान पाहून त्या भारावून गेल्या. त्यांना वाटले असा सन्मान त्यांचाही झाला पाहिजे.

याबाबत अंबिका यांनी आपल्या पतीशी चर्चा केली. तेव्हा पती म्हणाले, हा मान मिळवणे सोपे काम नाहीये, त्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागते. पण अंबिका यांनी आपले ध्येय निश्चित केले होते. अधिकारी होण्याची सगळी प्रक्रिया अंबिका यांनी आपल्या पत्नीकडून समजून घेतली.

अंबिका यांचे शिक्षण पुर्ण नव्हते, त्यामुळे त्यांनी आपले शिक्षण पुर्ण करुन घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपले दहावीचे आणि बारावीचे शिक्षण पुर्ण केले त्यानंतर त्यांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले.

अंबिका ज्या गावात राहत होत्या त्या ठिकाणी एवढ्या सोई-सुविधा नव्हत्या, त्यामुळे त्यांच्या पतीने राहण्याची सोय चेन्नईमध्ये केली. पती मुलांना सांभाळत नोकरी करत होता.

अंबिका आपले ध्येय गाठण्यासाठी मेहनत घेत होत्या, पण तीनवेळा अंबिका यांना अपयश आले. पतीने तिला परत बोलावून घ्यायचा निर्णय घेतला, पण शेवटचा एक प्रयत्न करत असल्याचे अंबिका यांनी म्हटले.

अखेर अंबिका यांची मेहनतीला यश मिळाले, २००८ च्या आयपीएस लिस्टमध्ये अंबिका यांचे नाव आले. अंबिका यांची पहिली पोस्टींग महाराष्ट्रातच झाली होती, २०१९ मध्ये त्या डीएसपी म्हणून नियुक्त झाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.