शेतकऱ्याचा नाद खुळा! केळीच्या भट्टीचे ‘असे’ गणित लावून शेतकऱ्याने कमावले दलालाच्या चौपट पैसे

0

 

 

आजकाल शेतकरी शेतात नवनवीन प्रयोग करताना दिसून येत आहे. वेगवेगळ्या प्रयोगातून शेतकरी लाखोंचे उत्पन्न मिळवताना दिसून येत आहे. आजची गोष्ट पण अशाच एका शेतकऱ्याची आहे, ज्याने आपल्या एका एकराच्या शेतात चौपट उत्पन्न मिळवले आहे.

या शेतकऱ्याचे नाव दयासागर दाडगे असे आहे. दाडगे लातूर जिल्ह्याच्या जळकोट तालुक्यातील पाटोदा बुद्रुक येथे राहतात. त्यांनी दोन एकराच्या शेतीत केळीची लागवड करून नऊ महिन्याचा खर्च जाता साडे पाच लाख रुपये नफा मिळवला आहे.

दाडगे यांनी एप्रिल २०२० मध्ये जी नाईन नावाच्या जातीच्या २४०० बुडाची लागवड केली होती. त्यानंतर केळीचे दहा ट्रॅक्टर शेणखत, गांडूळ खताचा वापर त्यांनी केला.

त्यानंतर त्यांनी केळीची भट्टी घालून विक्री केल्याने त्यांनी उत्पादक ते शेतकरी अशाप्रकारे विक्री करत आहे, त्यामुळे त्यांना दलालाच्या मागणीपेक्षा चौपट भाव मिळत आहे.

एका केळीच्या झाडाला १२ डझन इथले फळ लागले होते, शेतकऱ्यांना केलं तोडून भट्टी लावणे शक्य होत नाही, त्यामुळे त्यांनी बाजारातील दोन तीन दलालांना आमंत्रण दिले. पण दलालाचे भाव पाहून त्यांना असे लक्षात आले की हे काही आपल्याला परवडणारे नाही.

तेव्हा त्यांनी अभ्यास करण्यास सुरुवात केली. त्यांनी एका झाडाला किती डझन केळी आहे, एक डझनला बाजारभाव किती आहे, या सर्वांचे गणित केले.

सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर यांनी २५ केळीच्या झाडांची भट्टी लावण्याचा निर्णय घेतला आणि स्वतः विक्री करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे त्यांना दलालाच्या चौपट भाव मिळायला लागला.

तसेच दयासागर यांनी केळीच्या झाडांना कुठल्याही रासायनिक खताचा वापर केला नाही, त्यामुळे त्यांची फळेही खाताना गोड आणि चविष्ट लागली, याचाही त्यांना चांगलाच फायदा झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.