दया नायक: एक प्लंबर कसा बनला एन्काउंटर स्पेशलिस्ट, ज्याने केले आहेत ८० पेक्षा जास्त एन्काउंटर

0

मुंबईच्या अंडरवर्ल्डच्या काळ्या दुनियेत अनेक अपराधा झाले. आज आम्ही हे अपराध करणाऱ्या गुंडाना नरकात पाठवणाऱ्या एका पोलिसवाल्याची कहानी सांगणार आहोत. पोलिसांच्या भाषेत अशा पोलिसांना एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणतात.

असेच एक पोलिस अधिकारी आहेत ज्यांनी गुंडांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले होते. त्यांचे नाव आहे दया नायक. कन्नड मीडियमध्ये शिक्षण घेतल्यानंतर ७ वी पास केल्यानंतर १९७९ मध्ये दया नायक मुंबईमध्ये आले होते.

कर्नाटकच्या एका छोट्या गावातून मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांना पोलिसांत आपले नाव कमावण्यासाठी ३० वर्षे गेली. त्यानंतर ते निडर आणि प्रसिद्ध पोलीस अधिकारी बनले होते. मुंबईमध्ये आल्यानंतर दया नायक यांनी एका हॉटेलमध्ये काम केले आणि तेच त्यांचे घर होते.

त्यांनी अनेकवेळा स्ट्रीटलाईटखाली बसून अभ्यास केला होता. मेहनत आणि खुप अभ्यास करून त्यांनी गोरेगावमधील एका शाळेतून १२ वी पास केली आणि अंधेरीच्या एका कॉलेजमधून ग्रॅजूएशन पुर्ण केले.

द्या नायक यांच्या आयुष्यावर एक चित्रपटदेखील आला होता. ज्यामध्ये नाना पाटेकर मुख्य भुमिकेत होते. त्या चित्रपटाचे नाव होते अब तक ५६. कॉलेज झाल्यानंतर दया नायक प्लंबर म्हणून काम करू लागले.

त्याचवेळी त्यांची ओळख नार्कोटीक्स डिपार्टमेंटच्या काही अधिकाऱ्यांशी झाली. त्यानंतर ते त्यांची वर्दी पाहून खुप प्रभावित झाले. वर्ष १९९५ मध्ये दया नायक यांची पोस्टींग जुहूमध्ये झाली होती. १९९६ मध्ये त्यांनी जुहूमध्ये छोटा राजनच्या दोन साथिदारांचा एन्काउंटर केला होता.

हे त्यांच्या करिअरमधील पहिले एन्काउंटर होते. पुढे त्यांनी अनेक एन्काउंटर केले आणि नंतर ते एन्काउंटर स्पेशलिस्ट बनले. त्यांनी नंतर ८० पेक्षा जास्त एन्काउंटर केले. त्यानंतर पुढे पोलिसांनी अनेक एन्काउंटर केले आणि मोठमोठे गुंडसुद्धा पोलिसांना घाबरायला लागले होते.

एकदा मुंबईमध्ये दादरच्या परिसरात फुल मार्केट येथे दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. जेव्हा द्या नायक त्या मार्केटमध्ये पोहोचले तेव्हा दहशतवाद्यांनी त्यांना त्यांच्यावर गोळ्या चालवण्यास सुरूवात केली.

गोळ्यांपासून ते वाचले पण दहशतवाद्यांनी त्यांच्यावर बॉम्बनी हल्ला केला. त्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. १७ दिवस त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. मुंबईचे मोठे अपराधी विनोद माटकर, राफिक डबावाला आणि तौफिक कालिया अशा मोठमोठ्या गुंडांना त्यांनी यमदसनी पाठवले आहे.

तसेच ३०० पेक्षा जास्त गुंडांना त्यांनी अटक केली आहे. त्यांच्यावर अनेक आरोपही झाले होते. त्यांच्या नावावर अनेक बेनामी संपत्ती असल्याप्रकरणी त्यांना अटक झाली होती पण नंतर ते त्यातून निर्दोश मुक्त झाले होते.

२००३ मध्ये पत्रकार केतन तिरोडकरने त्यांच्यावर आरोप लावला होता की ते अंडरवर्ल्डसोबत मिळून काम करतात. तसेच ते लोकांना धमकावतात आणि त्यांच्याकडून पैशांची वसुली करतात. या प्रकरणात त्यांची चौकशी झाली होती पण त्यातूनही ते निर्दोश मुक्त झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.