..आणि शहीद भगतसिंगने आपल्या आईची ती शेवटची इच्छा पुर्ण केली, वाचा त्या दिवशीचा पुर्ण घटनाक्रम

0

देशासाठी हसत हसत फासावर चढणाऱ्या शहीद भगत सिंग यांना लाहौर सेंट्रल जेलमध्ये २३ मार्च १९३१ ला फाशी देण्यात आली होती. पण त्यांना ज्या दिवशी फाशी देण्यात येणार होती त्या दिवशी त्यांना फाशी देण्यात आली नाही.

उलट त्यांना ठरलेल्या दिवसाच्या आदल्या दिवशी फाशी देण्यात आली होती. इंग्रजांनी त्यांना २४ मार्च १९३१ ला फाशी देण्याचे ठरवले होते. पण इंग्रजांनी या तारखेत बदल केला आणि २३ मार्चला त्यांना फाशी दिली.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे आनंदाने फासावर चढले. देशासाठी आपले प्राण देणारे सगळेच नसतात असे खुप कमी लोक आहेत ज्यांनी देशासाठी आपले प्राण दिले. जेव्हा त्यांना फाशी देण्याची माहिती जेव्हा देशातील लोकांना कळली तेव्हा देशातील लोक खुप भडकले होते.

पुर्ण देशभरात त्याचे पडसाद उमटले होते. सगळीकडे इंग्रज सरकारच्या विरोधात आंदोलने होत होती. त्यामुळे इंग्रज सरकार खुप घाबरले होते. प्रकरण आजून चिघळू नये म्हणून इंग्रजांनी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या फाशी देण्याच्या तारखेत बदल केला आणि त्यांना एक दिवस आधीच फाशी देण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, २३ मार्च १९३१ लाच जेलमध्ये धावपळ सुरू झाली होती. इंग्रजांनी भगतसिंग यांच्यावर अनेक गंभीर आरोप लावले होते आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. जेव्हा भगतसिंग यांना फाशी देण्यात येणार होती तेव्हा भगतसिंग यांच्या तोंडावर थोडीपण भिती नव्हती.

ते बाकीच्या कैद्यांसोबत गप्पा मारत फिरत होते. २४ मार्चला ४ वाजता सगळ्या कैद्यांना सांगण्यात आले की सगळेजण आपआपल्या बॅरेकमध्ये जा. सगळे कैदी विचारात पडले की हे काय चालले आहे. तेव्हा एक न्हावी कैद्यांच्या जवळ आला आणि म्हणाला की आज रात्री भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी होणार आहे.

ही बातमी ऐकल्यावर सगळे कैदी खुप संतापले होते. कोणतीही कायदेशीर कारवाई पुर्ण न करता असे कसे इंग्रज तिघांना फाशी देऊ शकतात? त्यानंतर भगतसिंगलाही कळले की त्याला दुसऱ्या दिवशी पहाटे ४ च्या ऐवजी आजच संध्याकाळी ७ वाजता फाशी देण्यात येणार आहे.

हे ऐकल्यावर भगतसिंग म्हणाले की, तुम्ही मला या पुस्तकाचा एक अध्याय वाचून देणार आहात की नाही? त्यानंतर काही वेळाने तिन्ही क्रांतीकारकांना फाशीसाठी तयार करण्यासाठी कोठडीतून बाहेर आणण्यात आले. त्यानंतर त्यांचे वजन करण्यात आले आणि शेवटचे स्नान करण्यास सांगण्यात आले.

मग त्यांना काळे कपडे घालण्यात आले पण त्यांचे चेहरे उघडेच ठेवण्यात आले. जेव्हा घड्याळात बरोबर सहा वाजले तेव्हा सगळ्यांना इंकलाब जिंदाबाद आणि हिंदुस्तान आजादचे नारे ऐकू येऊ लागले. भगतसिंग यांनी आपल्या आईला दिलेले वचन पुर्ण केले की फाशीवर जाताना इंकलाब जिंदाबादचे नारे त्यांनी लगावले.

सुखदेव म्हणाले की सर्वात आधी मला फाशी द्या. जल्लाद आला आणि त्याने एक एक करून तिघांनाही फाशी दिली. बराच वेळ त्यांचे मृतदेह तसेच लटकत होते. जेव्हा त्यांना खाली उतरवण्यात आलं तेव्हा डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं. अशाप्रकारे देशाचे तीन तरूण स्वातंत्र्यासाठी आनंदाने फासावर चढले.

Leave A Reply

Your email address will not be published.